Mirzapur 5 Prime Video Series: 'मिर्झापूर' आवडली? विकेंडला घरबसल्या पाहा 5 खिळवून ठेवणाऱ्या क्राइम सिरीज; 'ही' तर सत्य घटनेवर आधारित
5 Prime Video Series: या विकेंडला घरबसल्या 5 वेब सिरीज नक्कीच पाहा.
Continues below advertisement

5 Prime Video Series
Continues below advertisement
1/8
'मिर्झापूर: द मुव्ही' या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 4 सप्टेंबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमच्या सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या 'मिर्झापूर' या वेब सिरीजवर आधारीत आहे.
2/8
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमातील काही पात्रे मालिकेतील काही पात्रांसारखीच असल्याची माहिती आहे. जर, आपल्याला 'मिर्झापूर' आवडली असेल, तर आपल्याला अॅमेझॉन प्राइममधील इतर 5 वेब सिरीजही नक्कीच आवडतील.
3/8
अॅमेझॉन प्राइममधील या 5 वेब सिरीज आपल्याला नक्कीच आवडतील. त्या 5 वेब सिरीज कोणत्या? एक वेब सिरीज सत्य घटनेवर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
4/8
'दहाड' या 8 एपिसोडच्या सिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, गुलशन देवैया आणि विजय वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या वेब सिरीजची कथा अशा एका सीरिअल किलरभोवती फिरते, जो केवळ महिलांची हत्या करतो. IMDbमध्ये या वेब सिरीजला 7.6 रेटिंग देण्यात आली आहे.
5/8
'तांडव' ही 9 एपिसोडची वेब सिरीज एक पॉलिटिकल क्राइम सिरीजवर आधारीत आहे. या वेब सिरीजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, जीशान अयुब आणि सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिका आहेत.
Continues below advertisement
6/8
'पाताल लोक' या वेब सिरीजची विशेष चर्चा झाली. या सिरीजचे दोन सिझन रिलीज झाले आहेत. या सिरीजमध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंह आणि अभिषेक बॅनर्जी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
7/8
'द फॅमिली मॅन'चे आतापर्यंत तीन सिझन रिलीज झाले आहेत. या सिरीजमध्ये मनोज बाजपेयी, शारिब हाश्मी, वेदांस सिन्हा, दर्शन कुमार यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही एक स्पाय अॅक्शन क्राइम सिरीज आहे.
8/8
'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह' ही सिरीज 2023 साली रिलीज झाली होती. ही सिरीज कीरा खलीली हत्याकांडवर आधारीत आहे. या सिरीजमध्ये 4 एपिसोड्स आहेत.
Published at : 03 Sep 2026 11:43 AM (IST)