Lai Avadtes Tu Mala Marathi Serial Track: सुखाच्या प्रवासात अनपेक्षित संकट; सरकार-सानिकासमोर नवं आव्हान, पुढे काय घडणार?
Lai Avadtes Tu Mala Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लय आवडतेस तू मला (Lai Avadtes Tu Mala) सरकार आणि सानिकाचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.
Lai Avadtes Tu Mala Marathi Serial Track
1/9
या सोहळ्यानं दोन्ही गावांमधील वैर संपुष्टात आलं आहे.
2/9
साहेब रावांनीही आता सानिकाला पूर्णपणे स्वीकारलं असून, सरकारलाही जावयाच्या नात्यानं मान्यता दिली आहे.
3/9
सर्वत्र आनंदाचं वातावरण असतानाच, नव्या आयुष्याच्या या प्रवासात काही अनपेक्षित घटना घडू लागतात.
4/9
सरकारनं सानिकासाठी खास हनीमून ट्रिपची आखणी केली आहे, त्यामुळे दोघे एकत्र नवी सुरुवात करत आहेत.
5/9
दुसरीकडे, कुटुंबाला एका अनोळखी स्त्रीकडून धक्कादायक इशारा मिळतो, ज्यामुळे सगळे चिंतेत पडतात.
6/9
परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत जाते, आणि कुटुंबातील एका व्यक्तीला एक कठीण व्रत करावे लागते. मात्र, या धार्मिक विधीसोबतच काही अघोरी घटना घडतात, ज्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
7/9
सरकार-सानिका अनपेक्षित संकटाच्या भोवऱ्यात सापडतात आणि एक नवा संघर्ष सुरू होतो.
8/9
आता पुढे काय घडणार? हा नवा डाव कोणाचा आहे? आणि सरकार-सानिका यातून सुखरूप बाहेर पडतील का?
9/9
सरकार - सानिका या संकंटाला कसे सामोरे जाणार? हे मालिकेतील पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
Published at : 02 Apr 2025 08:27 AM (IST)