रश्मीका बद्दलच्या 'या ' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) साऊथ सिनेसृष्टीतील मेगा सुपरस्टार, ज्या अभिनेत्रीला रातोरात नॅशनल क्रशचा (National crush) हा टॅग मिळाला आहे. ती रश्मिका आजकाल सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. (photo : rashmika_mandanna/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दाक्षिणात्य सिनेमांबरोबरच आता बॉलिवूडमध्येही रश्मिका मंदान्नाची चर्चा आहे. ही अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्राबरोबर मिशन मजनू (Mission Majnu) या चित्रपटात दिसणार आहे. वयाच्या 17 व्या वर्षी अभिनय विश्वात प्रवेश केलेल्या रश्मिकाने अभ्यासातही अव्वल स्थान पटकावले आहे. (photo : rashmika_mandanna/ig)

कर्नाटकात जन्मलेल्या रश्मिका मंदान्ना हिचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी झाला. रश्मिकाने तिचे शालेय शिक्षण कुर्ग पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. तर पुढे एमएस रमैया कॉलेजमधून मानसशास्त्र आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. रश्मिकाला प्रवास आणि जिमिंगची खूप आवड आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभिनेत्री ती जीममध्ये नेहमीच वर्कआऊट करताना दिसते. (photo : rashmika_mandanna/ig)
रश्मिका ही सुरुवातीपासूनच तिच्या आई-वडिलांची लाडकी मुलगी आहे. पण कामाच्या हव्यासापोटी रश्मिका कोणाचेही ऐकत नाही. रश्मिका स्वतःच्या आणि तिच्या कामात कोणाचा ढवळाढवळ सहन करू शकत नाही. (photo : rashmika_mandanna/ig)
वयाच्या 17 व्या वर्षी रश्मिकाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. रश्मिका साऊथ सिनेसृष्टीतून बॉलीवूडची सुपरस्टार बनली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे 29 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिची गोंडस फोटोंची झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तिचे बोलके डोळे आणि तिच्या स्मित हास्याने तिने अनेकांना घायाळ केले आहे. (photo : rashmika_mandanna/ig)
पुष्पाच्या यशापासून, रश्मिकाला सुपरहिट चित्रपटांची रांगच लागली आहे. मोठे मोठे दिग्दर्शक रश्मिकाबरोबर काम करू इच्छित आहेत. (photo : rashmika_mandanna/ig)