Karishma Tanna: करिश्मा तन्नाला नीता अंबानींकडून सरप्राइज! जामनगरहून पाठवला खास बॉक्स अन्..; PHOTOs
लग्नानंतर जवळपास चार वर्षांनी हे दोघे त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

Karishma Tanna
1/9
प्रेग्नन्सीमध्ये अनेक महिलांना वेगळे पदार्थांची इच्छा होत असते. अभिनेत्री करिश्मा तन्नाही लवकरच आई होणार आहे.
2/9
करिश्मासाठी उद्योगपती नीता अंबानी यांनी एक खास सरप्राइज पाठवले आहे.
3/9
करिश्माने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
4/9
या फोटोंमध्ये तिचा गोंडस बेबी बंप पाहायला मिळत असून प्रेग्नन्सीतील आनंदी क्षण तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
5/9
या फोटोंमध्ये एक आकर्षक गिफ्ट बॉक्सही दिसत आहे. या बॉक्समध्ये जामनगर येथील रिलायन्सच्या बागांमधून आणलेले दर्जेदार केसर आंबे होते. विशेष म्हणजे, नीता अंबानी यांनी स्वतः लिहिलेलं एक पत्रही पाठवले आहे.
6/9
"या केसर आंब्यांसोबत तुम्ही उन्हाळ्याच्या गोड चवीचा आनंद घ्याल, अशी आशा आहे!"असे त्या पत्रात लिहिले आहे.
7/9
करिश्माने आपल्या प्रेग्नन्सी क्रेव्हिंग्सची झलकही चाहत्यांना दाखवली. तिने चायनीज पदार्थांचा आस्वाद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.
8/9
गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असूनही करिश्मा फिटनेसकडे विशेष लक्ष देत असून नियमित व्यायामही करत आहे.
9/9
करिश्मा तन्ना आणि उद्योगपती वरुण बंगेरा यांनी ५ फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईत खासगी समारंभात विवाह केला होता.
Published at : 25 Jul 2026 01:41 PM (IST)