Kareena Kapoor : करीना कपूरचा लेपर्ड प्रिंट लूक; फॅशन क्वीन पुन्हा चर्चेत!
करीना कपूरने ८ ऑक्टोबरला दिल्लीत लेपर्ड प्रिंटची सब्यसाची शिफॉन साडी परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधले. तिचा स्टाइलिश लूक, सुंदर मेकअप आणि अॅक्सेसरीजमुळे फॅशन प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला.

Kareena Kapoor
1/10
करीना कपूर खान ही लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आहे, जिला सगळे "बेबो" म्हणूनही ओळखतात. तिचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी झाला.ती कपूर घराण्यातील आहे रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी आणि करिश्मा कपूरची बहीण आहे.
2/10
करीनाने 2000 मध्ये 'रेफ्युजी' चित्रपटातून अभिनय सुरू केला. त्यानंतर ती 60 हून अधिक चित्रपटांत दिसली आहे. तिच्या सुंदर आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे ती खूप प्रसिद्ध झाली आहे.
3/10
45 वर्षांची ही अभिनेत्री नेहमीच फॅशनमुळे ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक फॅशन प्रेमींना खूपच आवडतो.करीना कपूर जेव्हा बाहेर पडते, तेव्हा ती तिच्या फॅशनमुळे अगदी सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधते.
4/10
तसेच 8 ऑक्टोबरला,करीना कपूरने दिल्लीत एका कार्यक्रमात सगळ्यांचे लक्ष वेधले. तिने लेपर्ड प्रिंटची सुंदर अशी साडी घातली होती आणि ती साडी करीन वर खूप सुंदर दिसत होती . चला तिचा लूक पाहू आणि फॅशन टिप्स घेऊ.
5/10
करीन कपूरने सब्यसाचीची हलकी शिफॉन साडी घातली. साडीवर पिवळा आणि काळा लेपर्ड प्रिंट होता.आणि करीनाने ही साडी खूप ग्रेसफुली कॅरी केली होती.करीन कपूरने सब्यसाचीची हलकी शिफॉन साडी घातली. साडीवर पिवळा आणि काळा लेपर्ड प्रिंट होता.आणि करीनाने ही साडी खूप ग्रेसफुली कॅरी केली होती.
6/10
तिने साडीला मॅचिंग डीप नेक ब्रॅलेट ब्लाउज आणि फुल स्लीव्ह केपसह परिधान केले, जे छान आणि स्टाईलिश दिसत होते.
7/10
करीनाने निळ्या आणि हिरव्या रंगाचे मॅचिंग कानातले आणि सोबत अनेक अंगठ्या आणि सुंदर कुंदन नेकलेस घातला होता.
8/10
मेकअपमध्ये तिने ब्राऊन आयशॅडो, विंग्ड आयलाइनर, आणि ग्लॉसि गुलाबी लिपस्टिक लावलेली दिसतेय, ज्यामुळे तिचा लूक जास्त खुलून दिसत आहे.
9/10
करीनाच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आणि तिच्या फोटोना खूप लाईक्स, कमेंट्स मिळाले.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 10 Oct 2025 04:50 PM (IST)