Kantara Chapter 1 Box Office Collection Day 25: 'कांतारा चॅप्टर 1'ची धुवांधार कमाई, चौथ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर धुरळा; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
Kantara Chapter 1 Box Office Collection Day 25:ऋषभ शेट्टीचा धमाकेदार सिनेमा कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1 बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालतोय.
Kantara Chapter 1 Box Office Collection Day 25
1/10
पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवलेल्या सिनेमानं रिलीजच्या 25व्या दिवशीही दमदार कमाई केली आहे.
2/10
2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'कांतारा' ब्लॉकबस्टर ठरलेला. आता त्याचा प्रीक्वल 'कांतारा चॅप्टर 1' पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय.
3/10
चित्रपटानं पहिल्याच दिवशी तब्बल 61.85 कोटींची धमाकेदार ओपनिंग केली.
4/10
पहिल्या आठवड्यात 337.4 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 147.85 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 78.85 कोटींची कमाई करत चित्रपटानं आपली ताकद दाखवून दिलीय.
5/10
कर्नाटकमध्ये या चित्रपटानं 181 कोटी, तर हिंदीत सिनेमानं 192 कोटींची कमाई केली आहे.
6/10
'कांतारा चॅप्टर 1'नं 25 व्या दिवशी कलेक्शनमध्ये 10 कोटींची भर घातली.
7/10
संपूर्ण भारतात 'कांतारा चॅप्टर 1'नं 25 दिवसांत 589.20 कोटींचा आकडा पार केला, आणि आता तो 600 कोटींकडे वाटचाल करतोय.
8/10
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून, जगभरात या सिनेमानं 809 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
9/10
यासह 'कांतारा चॅप्टर 1'नं 'छावा'चा 807 कोटींचा जागतिक रेकॉर्ड मोडला आहे.
10/10
होम्बाले फिल्म्सनं दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं पहिल्या दोन आठवड्यात 717 कोटी, तर पुढील सहा दिवसांत अजून 92 कोटींची कमाई केली आहे.
Published at : 27 Oct 2025 12:01 PM (IST)
= 10">