Jai jai Swami Samarth: भोंदू चमत्कारांच्या विळख्यात अडकला निष्पाप जीव; जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामींच्या लीलांनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढली
स्वामींच्या गूढ आणि शांत लीलांमधून काही वेगळे संकेत मिळत असल्याचं दाखवलं जाणार आहे. श्रद्धेची परीक्षा, नात्यांची कसोटी आणि नियतीशी सुरू असलेली झुंज यामुळे कथा अधिक रंगतदार बनते

Marathi serial
1/7
जय जय स्वामी समर्थ या लोकप्रिय मालिकेत आता प्रेक्षकांना एक भावनिक आणि थरारक वळण पाहायला मिळणार आहे. स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या अंबादासच्या कुटुंबावर मोठं संकट ओढावतं, जेव्हा स्वामी कृपेने जन्मलेल्या त्यांच्या लाडक्या मुलगा वेदच्या आयुष्यावर मृत्यूची काळी छाया पडते.
2/7
वेदच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे घरात भीतीचं वातावरण निर्माण होतं. एका आईची हतबल माया आणि वडिलांची न ढळणारी श्रद्धा यामध्ये संघर्ष सुरू होतो.
3/7
गावात पसरत चाललेल्या भोंदू चमत्कारांमुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली सीमारेषा धूसर होत चालल्याचं चित्र दिसतं.
4/7
तथाकथित चमत्कारांनी लोकांना भुरळ घालू लागतो. काही जण त्याच्या मागे जातात, तर काहींचा विश्वास अजूनही स्वामींवर ठाम असतो. वेळेशी सुरू असलेल्या या शर्यतीत, एका निष्पाप जीवाचं आयुष्य वाचवण्यासाठी कोणता मार्ग खरा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो.
5/7
दरम्यान, स्वामींच्या गूढ आणि शांत लीलांमधून घडणाऱ्या घटना मात्र काही वेगळंच सूचित करत असतात. श्रद्धा खंबीर ठेवणाऱ्यांची परीक्षा घेतली जाते, नात्यांची कसोटी लागते आणि नियतीसमोर उभं ठाकलेलं संकट अधिक गडद होत जातं.
6/7
पण शेवटी, मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या वेदचं भविष्य काय असेल आणि स्वामींची कृपा त्याला वाचवू शकेल का याची उत्कंठा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरणार आहे.
7/7
मृत्यू हा शेवट नाही तर श्रद्धेची परीक्षा असते. मृत्यूच्या दारात असलेल्या लहानग्या वेदला कसं वाचवणार स्वामी?पहा, 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा', दररोज, संध्या. ६.३० वा. आणि दुपारी २.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
Published at : 09 Apr 2026 05:15 PM (IST)