होळीनिमित्त चित्रपटांच्या रंगांची उधळण; बॉलिवूडचे जबरदस्त सिनेमे, पाहा 'या' विकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर
Best Movies and Web Series Releasing on OTT This Week: मार्च च्या पहिल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध जॉनरचे चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होत आहेत.

Holi 2026 Special Must-Watch Movies
1/9
2026चा तिसरा महिना सुरु झाला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात होळी हा सण आला. होळी निमित्त काही जण घरातच चित्रपट किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज पाहून सुट्टीचा आनंद घेतात.
2/9
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. रोमँटिक ते अॅक्शन, बायोग्राफिकल ड्रामा ते थ्रिलर अशा विविध जॉनरचे चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात (2 ते 8 मे) कोणकोणते चित्रपट प्रदर्शित होणार, याची यादी पहा.
3/9
सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित आणि अनिल कपूर अभिनित सुबेदार हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनिल कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात राधिका मदन, मोना सिंह, आदित्य रावल आणि इतर कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 5 मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
4/9
पंकज कपूर, डिंपल कपाडिया, अपारशक्ती खुराणा आणि समीर सोनी अभिनीत जब खुली किताब हा चित्रपट याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट 6 मार्चपासून प्रेक्षकांना झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
5/9
प्रतीश मेहता दिग्दर्शित हेलो बच्चों ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर 6 मार्चला रिलीज होणार आहे. या सिरीजमध्ये पॅशनेट शिक्षकाचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
6/9
तेलुगु कॉमेडी ड्रामा ओम शांती शांती शांती 30 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता हा चित्रपट आपल्याला 4 मार्च रोजी अहा या ओटीटीवर पाहता येईल.
7/9
तामिळ रोमँटिक ड्रामा, विद लव्ह हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन वीकला रिलीज झाली होती. या चित्रपटातून अभिशन जीविंथ याने अॅक्टिंग क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट आता आपल्याला 6 मार्चपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
8/9
लालो कृष्ण सदा सहायते हा चित्रपट 100 कोटी रुपये कमाई करणारा पहिला गुजराती चित्रपट ठरला. या भक्तिमय चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट आपल्याला 6 मार्चपासून सोनीलाईव्हवर पाहता येईल.
9/9
द डायनासोर्स ही एक जबरदस्त डॉक्यूमेंट्री सिरीज आहे. स्टीवन स्पीलबर्गने यांनी निर्मित केलेली ही एक अभूतपूर्व माहितीपट मालिका आहे. 6 मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.
Published at : 02 Mar 2026 11:17 AM (IST)