पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...; गुढी पाडव्यासाठी पैठणी नेसून मिरवा, दिग्गज अभिनेत्रींचे लूक्स Follow करा
Bollywood Inspired Paithani Styles for Gudi Padwa: या गुडी पाडव्याला बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या पैठणी साडी स्टाइलिंग टिप्स. पाहा सेलिब्रिटींचे पारंपारिक लूक.

Bollywood Inspired Paithani Styles for Gudi Padwa
1/8
गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. गुढी पाडवा साजरा करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आणि खास आहे. या सणानिमित्त घर फुलांनी सजवलं जातं. पारंपारिक पोशाख घालून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
2/8
या खास सणानिमित्त बरेच जण पारंपारिक पोशाख घालण्यास प्राधान्य देतात. परंतु, पारंपारिक लूक नेमका कसा कॅरी करावा? याची आयडिया अनेकांना नसते. अशा वेळी आपण बॉलिवूड अभिनेत्रींकडून प्रेरणा घेऊ शकता. पारंपारिक टाइमलेस पैठणी साडी तुमच्या फेस्टिव्ह लूकचा भाग बनवू शकता.
3/8
विद्या बालन हिनं हिरव्या रंगाची पारंपारिक साडी नेसली आहे. या साडीवर ऑरेंज पदराचा सुंदर कॉन्ट्रास्ट दिसून येतोय. झरी काम आणि बोल्ड रंगसंगतीमुळे साडी सुरेख दिसत आहे. पारंपरिक दागिने आणि साध्या हेअरस्टाइलसह तिनं आपला लूक पूर्ण केला.
4/8
माधुरी दीक्षित हिचे अनेक पारंपारिक लूक आपण पाहिले असतील. आपण या गुढीपाडव्याला खास पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसू शकता. झरी बॉर्डर आणि पारंपरिक डिझाइनने साडीची शोभा वाढवली आहे. तिनं नथ आणि सोन्याचे दागिने घातले आहे. माधुरीनं केसांच्या बनवर गजरा माळला आहे.
5/8
शिल्पा शेट्टीनं पेस्टर पैठणी लूक कॅरी केला आहे. फ्लोरल डिझाइन आणि सिल्क शाइनमुळे साडी खूप ग्रेसफूल दिसत आहे. स्लीव्हलेस ब्लाऊज, ज्वेलरी अन् मोकळ्या केसांमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.
6/8
आलिया भट्टने पिच रंगाची पैठणी नेसली आहे. या साडीला पिंक बॉर्डर आहे. फ्लोरल डिझाइन आणि स्लीव्हलेस एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊजमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत आहे. मिनिमल अॅक्सेसरीज आणि स्लीक हेअरस्टाइलमध्ये आलिया खूप देखणी आणि एलिगंट दिसत आहे.
7/8
लाल पैठणीत अभिनेत्री जान्हवी कपूर आकर्षक दिसत आहेत. मल्टीकलर फ्लोरल डिझाइनमुळे साडीची शोभा वाढली. मॉडर्न ब्लाऊज आणि सॉफ्ट ग्लॅम मेकअपमुळे जान्हवी अधिक सुंदर दिसत आहे. तिनं या पैठणीवर केसांची वेणी घातली आहे.
8/8
श्रद्धा कपूर हिनं जांभळ्या रंगाची पैठणी नेसली आहे. तिनं झरी काम असणारे चोकर आणि कानात मोठे झुमके घातले आहे. सिंपल मेकअप लूकमध्येही अभिनेत्री रॉयल दिसत आहे. आपणही हा लूक खास गुढी पाडव्यानिमित्त कॅरी करु शकता.
Published at : 18 Mar 2026 01:09 PM (IST)