हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
सोशल मिडिया सेन्सेशन गिरीजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीचे एका मुलाखतीतील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.

Girija oak marathi ctress photo viral
1/10
सोशल मिडिया सेन्सेशन गिरीजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीचे एका मुलाखतीतील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
2/10
गिरीजा ओकचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सने तिच्या सौंदर्यावर भरभरुन व्यक्त होत तिचं कौतुक केलं होतं. त्यानंतर, तिनेही या अचानक झालेल्या नेटीझन्सच्या गुड ट्रोलिंगवर समाधान व आनंद व्यक्त केला
3/10
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सकडून गिरीजाचं कौतुक झालं, तर काहींनी तिला ट्रोलही केलं होतं. तिची तुलना इतर अभिनेत्रीशी करण्यात आली होती.
4/10
गिरीजाच्या सिंपल आणि सुंदर भावनांनी नेटीझन्सकडून कमेंटचा वर्षाव होत असताना आता तिचे आणखी काही फोटो समोर आले आहेत.
5/10
गिरीजाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन समुद्र किनारी मारलेल्या फेरफटक्याचे फोटो शेअर केले आहेत.
6/10
हा सागरी किनारा... असंच म्हणता येईल, असे फोटो अभिनेत्रीने शेअर केले असून तिच्या मनमोहक आणि साडीच्या पेहरावातील अदा मोहक वाटतात
7/10
इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत गिरीजाने I couldn’t. You choose.. असे कॅप्शन दिले आहे.
8/10
मी या फोटोंमधील कुठला सर्वात चांगला हे निवडू शकत नाही, त्यामुळे तुम्हीच निवड करा... अशी पोस्ट गिरीजाने केली असून तिच्या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत.
9/10
निळाभोर समुद्र, मंद वारा अन् अभिनेत्री गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा तिच्या चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
10/10
समुद्र किनारी निळ्याभोर समुद्राजवळ मंद वाऱ्याचा आनंद घेत असताना, तिने समुद्रकिनारच्या रेतीवर लोळून मनमोहक अदांंनी नेटीझन्सचं लक्ष वेधलं आहे
Published at : 05 Dec 2025 06:27 PM (IST)