एका रात्रीत नॅशनल क्रश, फोटोही Viral, गिरीजाचे वडील गिरीश ओक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'एका गोष्टीची किळस...'
Girish Oak Slams Trolls After Daughter Girija Oaks Viral Fame: गिरीजा ओकचे फोटो सोशल मीडियात व्हायरल. वडील गिरीश ओक यांची पहिली प्रतिक्रिया समोर.
Continues below advertisement

Girish Oak statement on daughter girija oak trolling
Continues below advertisement
1/8
Girish Oak statement on daughter trolling: गेल्या काही महिन्यांपासून गिरीजा ओक प्रकाशझोतात आहे. तिचा निळ्या साडीवरील फोटो प्रचंड व्हायरल झाला. ती रातोरात नॅशनल क्रश बनली होती.
2/8
तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले होते. गिरीजानं या काळात अनेकांना मुलाखती दिल्या. ती लाइमलाइटमध्ये होती. पण काही नेटकऱ्यांकडून तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता.
3/8
नॅशनल क्रश झाल्यानंतर गिरीजा ओकच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. लेकीला एका फोटोमुळे मिळत असलेल्या प्रसिद्धीबाबत गिरीश ओक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एक खंतही व्यक्त केली आहे.
4/8
मुलाखतीत गिरीश ओक म्हणाले, 'तिच्या कामाचं मला निश्चितच कौतुक आहे. गिरीजा जे काही करते, त्याचं मला कायम कौतुक असतं'
5/8
'तिचा फोटो व्हायरल झाला. तिच्या फोटोवर येणारे कमेंट्स.. चेहरा, आवाज नसलेली रिकामटेकडी लोक, त्यांची बौद्धिक कुवत कितपत असेल, हे मला ठाऊक नाही.. पण काही जण पडद्याआड राहून भित्र्याप्रमाणे कमेंट करतात'.
Continues below advertisement
6/8
'याची मला किळस येते. हे सगळं पाहून माझ्यासारखा माणूस डिस्टर्ब होत नाही. पण सेंसिटिव्ह माणूस नक्कीच डिस्टर्ब होऊ शकतो'.
7/8
'परंतु, त्या गोष्टीला काही इलाज नाही. काहींना कळत नाही आपण काय करतो आहे', असं गिरीश ओक म्हणाले.
8/8
'सोशल मीडियावरील अनेक गोष्टी मला नाही आवडत, मला खरंतर किळस वाटते. मी सोशल मीडिया वापरतो. स्टँडअप कॉमेडी पाहतो. मला या गोष्टी आवडतात. परंतु, ट्रोलिंग अजिबात आवडत नाही. पटतही नाही', असंही गिरीश ओक म्हणाले.
Published at : 25 Feb 2026 07:11 PM (IST)