Gautami patil new song Sonchafa : गौतमीचं नवीन गाणं ‘सोनचाफा’नं चाहत्यांना पुन्हा एकदा वेडं केलं!
Gautami patil new song Sonchafa : गौतमी तिच्या किल्लर अदांसाठी नेहमीच चर्चेत असते, तिचं नवीन गाणं ‘सोनचाफा नुकतंच आलंय आणि पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना तिने वेडं केलंय...
Gautami Patil
1/10
'सोनचाफा' गाण्यातून बहरतायत गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) अदा, दमदार परफॉर्मन्समुळे आयटम साँगची चर्चा 'साईरत्न एंटरटेनमेंट'च्या 'सोनचाफा'
2/10
गाण्यात गौतमी पाटीलचा धुवाधार परफॉर्मन्स, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस 'माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी' या 'सोनचाफा' गाण्यातील ओळींप्रमाणेच नृत्यांगना गौतमी पाटीलच्या रूपावर खरंच दुनिया फिदा आहे.
3/10
काही दिवसांपासून 'सोनचाफा' गाण्याची चर्चा सुरु होती, अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
4/10
गौतमी पाटीलचं दिलखेचक अदांनी भरलेलं हे नवंकोरं 'सोनचाफा' हे गाणं आता रसिकांच्या भेटीस आलं आहे.
5/10
गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने अर्थातच थिरकायला भाग पाडलं आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
6/10
या गाण्याच्या प्रवासाबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली, " 'साईरत्न एंटरटेनमेंट'बरोबर हे माझं तिसरं गाणं आहे. सोनचाफा हे गाणं करताना खूप मज्जा आली.
7/10
गाण्यातील लूक, डान्स स्टेप सगळंच भारी होतं. आणि माझ्या साऱ्या चाहत्यांना हे गाणं नक्की आवडेल याची खात्री आहे".
8/10
तर निर्माते संदेश गाडेकर म्हणाले, "साईरत्न एंटरटेनमेंट' नेहमीच रसिकांसाठी नवनवीन गाणी घेऊन येत असतं.
9/10
अशातच आता सोनचाफा हे गाणं या यादीत आलं आहे. गौतमीच्या डान्सने तर साऱ्यांना वेड केलं आहे.
10/10
तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेतच आणि आताही या सोनचाफा मधील तिचा परफॉर्मन्स अनेकांच्या मनावर राज्य करत आहे".
Published at : 23 Sep 2025 05:52 PM (IST)
= 10">