या शुक्रवारी मनोरंजनाचा धमाका! OTT ते थिएटर एकाच दिवशी तब्बल 7 मोठे चित्रपट-सीरिज होणार रिलीज
OTT Upcoming Movies Series: या आठवड्याचाही शुक्रवार मनोरंजनप्रेमींसाठी खास ठरणार आहे.
Continues below advertisement

या आठवड्याचाही शुक्रवार मनोरंजनप्रेमींसाठी खास ठरणार आहे
Continues below advertisement
1/8
अॅक्शन, थ्रिलर, रोमँस, फॅन्टसी आणि सोशल ड्रामापर्यंत विविध प्रकारचा कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाहूया, या शुक्रवारी कोणते चित्रपट आणि सीरिज पाहण्यास उपलब्ध असतील.
2/8
द ईस्ट पॅलेस (The East Palace): चो सेउंग वू आणि नाम जू ह्युक यांची ही कोरियन डार्क फॅन्टसी सीरिज आहे. भुतांचा नायनाट करण्याची शक्ती असलेल्या तलवारबाजाला राजा आपल्या सैन्यात सामील करतो. यानंतर काय घडतं हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. ही सीरिज 17 जुलैपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
3/8
द ओडिसी (The Odyssey) ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित या चित्रपटात मॅट डेमन, टॉम हॉलंड आणि झेंडाया प्रमुख भूमिकेत आहेत. ट्रॉयचे युद्ध जिंकल्यानंतर ओडीसियसच्या धोकादायक प्रवासाची कथा यात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 17 जुलैपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
4/8
मा इंटी बंगाराम (Maa Inti Bangaaram) सामंथा रुथ प्रभू अभिनीत हा तेलुगू अॅक्शन क्राइम थ्रिलर आहे. लग्नानंतर शांत आयुष्य जगणाऱ्या माजी सुपारी किलरचा भूतकाळ पुन्हा तिच्यासमोर येतो. हा चित्रपट 17 जुलैपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
5/8
डिझायर (Desire) ही मेक्सिकन इरॉटिक थ्रिलर एका यशस्वी महिला वकिलीची कथा सांगते. विवाहबाह्य संबंधांमुळे तिच्या आयुष्यात मोठे बदल घडतात. हा चित्रपट 17 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
Continues below advertisement
6/8
हार्टस्टॉपर फॉरेव्हर (Heartstopper Forever) निक आणि चार्ली यांच्या नात्याची ही रोमँटिक कथा आहे. लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपमधील भावनिक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागतो. ही फिल्म 17 जुलैपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
7/8
द डेव्हिल (The Devil) दर्शन अभिनीत हा कन्नड अॅक्शन ड्रामा आता ओटीटीवर येत आहे. चित्रपटात राजकीय संघर्षासोबत दमदार अॅक्शन पाहायला मिळते. हा चित्रपट 17 जुलैपासून ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे.
8/8
23,000 लाइव्ह्स (23,000 Lives) सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात निर्वासितांना वाचवण्यासाठी झटणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांची कथा आहे. त्यांचे मिशन पुढे नैतिक आणि कायदेशीर संघर्षात अडकते. हा चित्रपट 17 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
Published at : 16 Jul 2026 09:05 PM (IST)