Fire Breaks Out At Anupama Set In Mumbai Film City: अनुपमा मालिकेच्या सेटवर भीषण आग, जीवितहानी नाही, मात्र संपूर्ण सेट जळून खाक PHOTOs
Fire In Goregaon Film City: मुंबईतील गोरेगाव पूर्वेत फिल्म सिटीमध्ये मोठी आग लागल्याची माहिती मिळतेय. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागली. यामध्ये एका मालिकेचा सेट जळून खाक झालाय.

Fire In Goregaon Film City
1/9
मुंबई फिल्म सिटीमध्ये लागली मोठी आग लागली असून अनुपमा सिरीयलच्या सेटवर मोठी आग लागली असल्याची माहिती मिळतेय.
2/9
आगीची माहिती मिळतच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आलेत.
3/9
रविवार असल्यामुळे अनुपमा मालिकेच्या सेटवर शूटिंग बदं होतं. त्यामुळे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
4/9
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
5/9
अचानक लागलेल्या आगीत अनुपमा मालिकेचा सेट मात्र जळून खाक झाला आहे.
6/9
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं समजत आहे, तसेच, अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
7/9
आग आटोक्यात आणल्यानंतर या संदर्भात अधिक तपास आरे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करणार आहेत.
8/9
त्यामुळे आगीचं खरं कारणं समोर येऊ शकेल.
9/9
दरम्यान, मालिकेतील सर्व कलाकार आणि सेटवरचा संपूर्ण क्रू सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
Published at : 23 Jun 2025 08:29 AM (IST)