In Pics : सोशल मीडियावर 'शालू'चीच हवा, राजेश्वरी खरातच्या हॉट फोटोशूटने चाहते घायाळ!

राजेश्वरी खरात
1/11
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी मोक्कार गाजली.
2/11
ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
3/11
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
4/11
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.
5/11
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
6/11
ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
7/11
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
8/11
विशेष म्हणजे ती अनेकदा चाहत्यांच्या कमेंटवर देखील उत्तरं देताना दिसते.
9/11
चाहते जर तिला ट्रोल करत असतील तर ती अगदी प्रेमाने टोलेबाजी करताना देखील पाहायला मिळते.
10/11
सध्या राजेश्वरीचे सोनेरी रंगाच्या ड्रेसमधील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
11/11
हे सर्व फोटो राजेश्वरी खरातच्या सोशल मीडियावरुन घेण्यात आलेले आहेत.
Published at : 17 Apr 2021 06:55 PM (IST)