Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 02 Jun 2021 08:29 PM (IST)
Feature_Photo_5_(4)
1/10
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी गाजली.
2/10
साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.
3/10
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
4/10
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
5/10
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. 'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.
6/10
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
7/10
ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
8/10
सध्या तिने टाकलेले काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हॉट फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
9/10
विशेष म्हणजे ती अनेकदा चाहत्यांच्या कमेंटवर देखील उत्तरं देताना दिसते. चाहते जर तिला ट्रोल करत असतील तर ती अगदी प्रेमाने टोलेबाजी करताना देखील पाहायला मिळते.
10/10
हे सर्व फोटो राजेश्वरी खरातच्या सोशल मीडियावरुन घेण्यात आलेले आहेत.