असे हिरो-हिरोईन ज्यांची लव्हस्टोरी जणू दुसरा चित्रपटच! अभिनय करताना जीव जडला अन्... शोएब-दीपिका यांची कहाणी नेमकी काय?
छोड्या पडद्यावर काम करणारी ही जोडी देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांची प्रेमकहाणी एका चित्रपटापेक्षा कमी नाही. या जोडीने नुकतेच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

dipika kakar and shoaib ibrahim
1/12
मनोरंजन विश्वात अशा काही जोड्या आहेत, ज्या आजही अनेकांसाठी आदर्शवत वाटतात. काही कलाकार आजही आपल्या जोडीदारावर जीवापाड प्रेम करतात.
2/12
छोड्या पडद्यावर काम करणारे काही कलाकारांच्या प्रेमकहाण्या तर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. काही अभिनेता-अभिनेत्रींच्या लग्नाला अनेक वर्षे उलटून गेलेली आहेत, मात्र अजूनही त्यांच्या प्रेमाची आजही तेवढीच चर्चा होते.
3/12
यामध्ये शोएब इब्राहीम आणि दीपिका कक्कड या जोडीचे नाव प्राधान्याने घेतले जाते. त्यांनी 22 फेब्रुवारी रोजी आपल्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला.
4/12
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इब्राहीमने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटो तर अगदीच खास आहेत. त्याने या फोटोंच्या माध्यमातून एका प्रकारे त्यांच्या प्रेमाचा प्रवसाच उलगडला आहे.
5/12
काही फोटो हे इब्राहीम आणि दीपिका यांच्या लग्नाआधीचे आहेत. तर काही फोटो हे लग्नादरम्यानचे आहेत. काही फोटोंमध्ये हे दोघेही त्यांच्या मुलासोबत आहेत.
6/12
इब्राहीम आणि दीपिका यांच्या मुलाचे नाव रुहान असे आहे. त्यांच्या मुलाचेही काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7/12
इब्राहीम आणि दीपिका यांच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत. मात्र त्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटातील कहाणीप्रमाणेच आहे.
8/12
हो देघेही 'ससुराल सिमर का' या मालिकेत नायक-नायिका म्हणून काम करत होते. याच काळात या दोघांमध्ये मैत्री झाली.
9/12
या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. त्यानंतर पुढचा काही काळ या दोघांनीही एकमेकांना डेट केलं. दोघांमध्ये प्रेम वाढत गेलं. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
10/12
या दोघांनी 22 फेब्रुवारी 2018 रोजी लग्न केलं. त्यांचे लग्न भोपाळमध्ये झाले होते. 21 जून 2023 रोजी त्यांना मुलगा झाला. त्यांच्या या मुलाचे नाव रुहान असे आहे.
11/12
इब्राहिम आणि दीपिका यांच्या लग्नाताली फोटो
12/12
इब्राहिम आणि दीपिका यांच्या लग्नाताली फोटो
Published at : 23 Feb 2025 02:51 PM (IST)