Happy Birthday Dharmendra : धर्मेंद्र बॉलिवूडमधील सर्वात देखणे अभिनेते, दिग्गज अभिनेत्याची कबुली

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस, धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी झाला, आज ते 86 वर्षांचे झालेत. (photo:aapkadharam/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेते धर्मेंद्र हे बॉलीवूडचे सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता म्हणूनही ओळखले जातात, याची कबुली खुद्द सलमान खान याने दिली आहे. (photo:aapkadharam/ig)

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहने सलमान खानला एका शो मध्ये प्रश्न विचारला 'बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता कोण?' (photo:aapkadharam/ig)
त्यावेळी सलमान उत्तर देत म्हणाला, 'बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर आणि देखणे अभिनेते आहेत. मी नेहमीच धर्मेंद्र यांना फॉलो करतो. मी त्यांचा चाहता आहे,' (photo:aapkadharam/ig)
धर्मेंद्र यांनी हा व्हिडीयो सोशल मीडियावर शेअर केलाय, धर्मेंद्र हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. (photo:aapkadharam/ig)
धर्मेंद्र नेहमी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे काही जुने फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (photo:aapkadharam/ig)
काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या पहिल्या गाडीचा फोटो शेअर करत त्याबद्दलची आठवण सर्वांना सांगितली होती. (photo:aapkadharam/ig)