सुपरस्टारच्या दारात थांबले होते देव आनंद; नेमका किस्सा काय? का बघावी लागली त्यांना वाट?
2007 साली देव आनंद यांना अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर वाट बघण्यास भाग पाडण्यात आले होते. जवळच्या मित्राने सांगितला तो किस्सा.

Dev anand waiting for Amitabh bachhan
1/10
बॉलिवूडचे एव्हरग्रीन हिरो देव आनंद आपल्या हटके अंदाजासाठी ओळखले जातात.
2/10
देव आनंद यांचे चित्रपट आजही तितक्याच आवडीने पाहिले जातात.
3/10
देवानंद यांनी 1946 साली 'हम एक हैं' या चित्रपटातून चित्रपटसुष्टीत पदार्पण केलं.
4/10
देव आनंद हे त्यांच्या काळातील सगळ्यात मोठे सुपरस्टार होते .
5/10
प्रसिद्ध अभिनेते, लेखक, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक देव आनंद यांचे 2011 साली निधन झाले .
6/10
देव आनंद यांच्या आठवणीत त्यांचे मित्र मोहन चुरीवाला यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले.
7/10
मोहन म्हणाले, आत्मचरित्राच्या लाँचवेळी अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अमिताभ पुस्तकाची प्रत न घेताच निघून गेले .
8/10
दुसऱ्या दिवशी देवानंद यांनी जलसा येथे जाऊन अमिताभ बच्चन यांना प्रत दिली. परंतु देवानंद यांना अर्धा तास गेटबाहेर वाट बघावी लागली होती .
9/10
मोहन म्हणाले की, बच्चन कुटुंबाच्या जवळचे असलेले अमर सिंग यांनी पुस्तक प्रकाशनासाठी अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी घेतली होती.
10/10
देवानंद यांचं 'रोमांसिंग विथ लाईफ' पुस्तक हे त्याच्या आयुष्यावर आधारित आत्मचरित्र आहे .
Published at : 15 Jan 2026 03:07 PM (IST)