PHOTO: 'कॉफी विथ करण 7'चा प्रिमिअर होणार 'या' दिवशी; करणनं दिली माहिती!
प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सहा सीझननं प्रेक्षकांचे मनोरंजन केले.(photo:karanjohar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा शो बंद होणार आहे, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. पण नंतर करणनं या कार्यक्रमाच्या नव्या सिझनबाबत माहिती दिली होती. 'कॉफी विथ करण 7'चा प्रिमिअर हा 7 जुलै रोजी होणार आहे. (photo:karanjohar/ig)
काही दिवसांपूर्वी करण अनुपमा चोप्रा यांच्या फिल्म कंपेनियनच्या मजेशीर चॅट शोमध्ये सामील झाला होता. या चॅट शोमध्ये करणनं 'कॉफी विथ करण'च्या नव्या सिझनबाबत सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, 'मी 7 जुलैला कॉफी विथ करणच्या 7 व्या सिझनचा प्रिमियर तुम्हाला दाखवण्यासाठी उत्सुक आहे.'(photo:karanjohar/ig)
करण हा 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी सहभाग घेतात. आमिर खान , शाहरूख खान , अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगतात. (photo:karanjohar/ig)
कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमधील एका एपिसोडमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान हे एकत्र उपस्थित राहणार आहेत, अशी चर्चा आहे. (photo:karanjohar/ig)
करणचा जुग जुग जियो आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (photo:karanjohar/ig)