Web Series On OTT: बोल्डनेसच्या बाबतीत हिंदी वेब सीरिजला देखील मागे टाकतात 'या' मराठी वेब सीरिज

Web Series On OTT: सध्या अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.

Web Series

1/9
सध्या सर्रास अनेक वेब सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अनेक हिंदी वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. अशातच काही अशा मराठी वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये किसिंग सीन, इंटिमेट सीन्स आणि खतरनाक डायलॉग्स आहेत.
2/9
रानबाजार ही गेल्या वर्षी रिलीज झालेली वेब सीरिज चर्चेत ठरली. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. प्राजक्तानं या सीरिजमध्ये रत्ना ही भूमिका साकारली.
3/9
. रत्नाच्या डायलॉग्सनं आणि तिच्या बोल्डनेसनं अनेकांचे लक्ष वेधले. तसेच या वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
4/9
काळे धंदे ही वेब सीरिज झी-5 या अॅपवर रिलीज झाली.
5/9
काळे धंदे या वेब सीरिजमध्ये महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे, शुभंकर तावडे यांनी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
6/9
'गेमाडपंथी' ही वेब सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली
7/9
चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे. प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव,सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग या कलारकारांनी प्रमूख भूमिका साकारल्या आहेत.
8/9
स्त्रीलिंग पुल्लिंग ही वेब सीरिज 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमध्ये निखिल चव्हाण, आरती मोरे, सायली पाटील आणि भाग्यश्री या कलाकारांनी काम केलं आहे. या वेब सीरिजध्ये पल्लवी, प्रिया आणि अर्चना या तीन मुलींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना दाखवण्यात आल्या आहेत.
9/9
स्त्रीलिंग पुल्लिंग सीरिजमधील काही डायलॉग्स, किसिंग सीन्स आणि इंटिमेट सीन्स आहेत. ही सीरिज युट्यूबवर रिलीज करण्यात आली. या सीरिजचे एकूण सहा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आले.
Sponsored Links by Taboola