उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. सनीने मालदीवमधील पर्यटनाचे फोटो शेअर केले आहेत.

Sunny leone maldives best vibes
1/7
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. सनीने मालदीवमधील पर्यटनाचे फोटो शेअर केले आहेत.
2/7
मालदीवच्या बीचवर हॉट अंदाजात सनीने आपला जलवा दाखवला, समुद्रकिनारी रेतीत लोळत अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे.
3/7
सनीने वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केलं असून कारवर बसूनही पोज दिल्या आहेत. लेट्स गो फॉर ड्राईव्ह असे कॅप्शन तिने ह्या फोटोंना दिले आहे.
4/7
बेस्ट टाईम, बेस्ट वाईबस् Best time, best vibes असे कॅप्शन देत पतीसोबत मालदीव बीचवरील हॉट फोटो सनीने शेअर केले आहेत, त्यामुळे चाहत्यांना सनीची अनेक दिवसांनी भेट झालीय.
5/7
सनीच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट करण्यात येत असून पती-पत्नीच्या फोटोवर क्युट कपलसह मजेशीर कमेंटही केल्या जात आहेत.
6/7
सनीचे फोटो पाहून चाहते अभिनेत्रीला दाद देत आहेत, काही चाहते तिला ट्रोलही करत आहेत. मात्र, या फोटोवर चाहत्यांच्या भरभरुन रिअॅक्शन येत आहेत.
7/7
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून सनीचा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला नाही, त्यामुळे, तिच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Published at : 09 May 2026 09:25 PM (IST)