Priyanka Chopra | देसी गर्ल प्रियंका चोप्राचं नवीन फोटोशूट; सोशल मीडियावर धुरळा! पाहा फोटो
अखेरीस द व्हाइट टाइगर (The White Tiger) चित्रपटात दिसलेली प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या सर्व परदेशी कमिटमेंट्स पूर्ण करण्यात व्यस्त आहे. बिलबोर्ड संगीत पुरस्कार 2021 मध्ये हजेरी लावल्यानंतर प्रियंका आता व्होग ऑस्ट्रेलियाच्या (Vogue Australia) कव्हर पेजवर दिसली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या शेडमध्ये दिसत आहे. तिच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिच्या आउटफिटवर जास्त लक्ष केंद्रीत करण्याच आल्याचं दिसतंय, तर मेकअप आणि ज्वेलरीही अगदी साधी ठेवण्यात आलीय. (फोटो - इंस्टाग्राम)
कव्हर पेजवरील प्रियांकाच्या आउटफिट विषयी सांगायचं झालं तर जोखीम घेण्यास आणि प्रयोग करण्यासाठी ती घाबरत नाही. यावेळीही तिने अतिशय यूनिक कलेक्शन निवडलं आहे. ती डीप वी नेकलाइन बोल्ड ड्रेसमध्ये दिसली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
सध्या प्रियंका तिच्या बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवरुन बरीच चर्चेत आहे. या कार्यक्रमासाठी तिने एक शानदार थाई स्लिट पोशाख निवडलाय जो तिच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य प्रकारे दिसतोय. (फोटो - इंस्टाग्राम)
प्रियंकाचा हा पोशाख खरोखर अनोखा होता. तिने हलके आणि गडद सोनेरी छटा असलेला थाई स्लीट गाऊनची निवड केली. या डीप व नेकलाइन आउटफिटची चर्चा भारतातही होत आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
प्रियांकाने या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती निक जोनाससोबत दिसली आहे. तिने या खास प्रसंगी निकवर तिचे प्रेमही व्यक्त केलंय. (फोटो - इंस्टाग्राम)
(फोटो - इंस्टाग्राम)