Malaika Arora | मलायका अरोराला मॉडेलऐवजी शिक्षक व्हायचे होते; पण..
मलायका अरोरा तिच्या काळातील एक प्रसिद्ध मॉडेल राहिली आहे. तिने एक व्हिडिओ अल्बम आणि बर्याच चित्रपटांमध्ये उत्कृष्ट आणि संस्मरणीय अभिनय केला आहे. छईयां छईया ते मुन्नी बदनाम आणि अनारकली डिस्को चली या गाण्यांनी धुरळा करणारी मलायका आज बॉलिवूडमधील नामांकित सेलिब्रेटी आहे. (Photo Credit - Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला हे माहिती आहे का? की मलायकाला कधीही डान्सर, परफॉर्मर किंवा मॉडेल बनण्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी तिचे स्वप्न काही वेगळे होते. खरं तर मलायकाला शिक्षिका होण्यात अधिक रस होता आणि विद्यार्थ्यांना आपला आवडता मानसशास्त्र विषय शिकवायचा होता. (Photo Credit - Instagram)
मलायकाला मानसशास्त्र या विषयाची आवड आहे. कारण ती लोकांचे मन आणि देहबोली सहज वाचू शकते. या कारणास्तव तिला यात शिक्षण क्षेत्रात जायचं होतं. पण तिच्या नशिबानं तिच्यासाठी वेगळाच मार्ग निवडला. (Photo Credit - Instagram)
अपघाताने मलायका अरोरा मॉडेलिंगमध्ये आली. इथं मिळालेल्या संधीचं तिनं सोनं केलं. आज तिने संपत्तीपासून प्रसिद्धीपर्यंत सर्व काही मिळवले आहे. आज ती इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस आणि स्टाइलिश सेलिब्रिटींमध्ये गणली जात आहे. (Photo Credit - Instagram)
मलायका अरोराला शाहरुख खानबरोबर ट्रेनच्या छतावर डान्स करून आपली खरी ओळख मिळाली आहे. आजही या गाण्याबद्दल बरीच चर्चा आहे. याशिवाय मलायकाने बरेच उत्तम डान्स केले आहेत. (Photo Credit - Instagram)
लवकरच मलायका आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे, ज्यात ती स्वयंपाक करताना दिसणार आहे. या शोचे नाव आहे - Star vs Food. मलायका अरोरा व्यतिरिक्त करण जोहर, अर्जुन कपूर, करीना कपूर असे स्टार यात दिसणार आहेत. (Photo Credit - Instagram)