Kuch Kuch Hota Hai: 'कुछ कुछ होता है' ची 25 वर्ष; 25 रुपयांत विकली गेली स्पेशल स्क्रीनिंगची तिकिटं
कुछ कुछ होता है या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहरने मुंबईत चाहत्यांसाठी हा चित्रपट तीन थिएटरमध्ये रिलीज करण्याची घोषणा केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 ऑक्टोबर रोजी कुछ कुछ होता है या चित्रपटाला रिलीज होऊन 25 वर्ष पूर्ण होणार आहेत.
करण जोहरनं चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी Book My Show अॅपवरुन तिकीट विकत घेतले . या अॅपनुसार मुंबईच्या PVR INOX ची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
स्क्रीनिंगची तिकिटे अवघ्या 25 रुपयांना विकली गेली. चित्रपटाच्या रविवारी रात्रीच्या शोच्या तिकिटांची किंमत फक्त 25 रुपये आहे. हा चित्रपट मुंबईत तीन स्क्रीनवर प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.
कुछ कुछ होता है या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
कुछ कुछ होता है हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात.
कुछ कुछ होता है या चित्रपटामधील गाण्यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांनी कुछ कुछ होता है या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.