Bollywood Celebrities Reaction: 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना'; सोनाक्षी ते विजय, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रतिक्रिया
Bollywood Celebrities on Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रतिक्रिया सोशल मीडियात व्हायरल.
Continues below advertisement

Bollywood Celebrities on Dharmendra Pradhan
Continues below advertisement
1/8
'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थी आंदोलकांच्या मागणीला अखेर आज शनिवारी यश आलं आहे. महिनाभर सुरु असलेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. आज केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
2/8
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांसाठी एक मोठा विजय मानला जात आहे. यावर आता नेते मंडळींसह बॉलिवूडमधील कलाकारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
3/8
अभिनेत्री स्वरा भास्करने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंनद व्यक्त केला आहे. स्वराने आपल्या इन्स्टाग्रामवर अभिजीत दिपकेंचा जल्लोष साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
4/8
अभिनेता विजय वर्माने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर धर्मेंद्र प्रधान यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना', असं लिहिलं आहे.
5/8
आयशा खान हिनं देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आनंद व्यक्त केला आहे.
Continues below advertisement
6/8
सिंगर आणि रॅपर रफ्तार यानेही धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रफ्तारने धर्मेंद्र प्रधान यांची पोस्ट शेअर करत, 'जेन झी'ला हट्टी असे म्हटले आहे.
7/8
कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 'प्रिय मुलांनो.. तुम्ही खरंच अप्रतिम आहात. पुढे काहीही होवो, विजय तुमचाच आहे', असं त्याने म्हटलं आहे.
8/8
सोनाक्षी सिन्हाने अभिजीत दिपकेंचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे.
Published at : 25 Jul 2026 05:40 PM (IST)