Bachchan Family: जया बच्चन यांनी जगातील सर्वात सुंदर मुलीला बच्चन घराण्याची सून म्हणून घरी आणलं, पहा सासू सुनेचं नातं कसं आहे
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. ऐश्वर्या रॉय बच्चन 2007 मध्ये या कुटुंबाचा एक भाग बनलेली. चला तर पाहूया कशी आहे या सासू सुनेची जोडी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे एकमेकांशी खुपचं चांगलं नातं आहे. ऐश्वर्या रायने जगातील सर्वात सुंदर महिला, मिस वर्ल्डचा खिताब पटकावला होता.
असे म्हटले जाते की ऐश्वर्याने सून होण्याआधीच तिच्या सासूचे मन जिंकले होते.
त्यामुळेच जया यांनी ऐश्वर्या रायला बच्चन कुटुंबाची सून मोठ्या थाटामाटात बनवलं
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाच्या काही वेळापूर्वी जया बच्चन करण जोहरच्या टॉक शोमध्ये बोलताना म्हणाली, ती सुंदर आहे. मला ती आवडते, मला आनंद आहे की ती आमच्या घराची सून होणार आहे.
ऐश्वर्या आणि जया अनेकदा एकमेकांसोबत दिसतात, या दोघी एकदम आई मुलीसारख्या राहतात. याआधी एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने ऐश्वर्याचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की तिच्याशी लग्न केल्यानंतर आयुष्यात अनेक बदल झाले. अभिषेकने सांगितले की, ऐश्वर्याशी लग्न करण्यापूर्वी त्याला आत्मविश्वास नव्हता, पण ऐश्वर्याने पुन्हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला.