4000 Crore Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये 53 वर्षांची 'ही' अभिनेत्री साकारणार मंथरा; कधीकाळी होती मनीषा कोइरालाची बॉडी डबल
Bollywood Actress Playing Manthara In 4000 Crore Ramayana: रणबीर कपूरच्या बहुचर्चित रामायण या सिनेमाबद्दल सध्या प्रचंड उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे.
Continues below advertisement

Bollywood Actress Playing Manthara In 4000 Crore Ramayana
Continues below advertisement
1/14
Bollywood Actress Playing Manthara In 4000 Crore Ramayana: रणबीर कपूरच्या बहुचर्चित 'रामायण' या सिनेमाबद्दल सध्या प्रचंड उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे. या भव्य प्रोजेक्टचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत असून, हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भव्य मायथॉलॉजिकल सिनेमा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
2/14
विशेष म्हणजे, हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे, पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये रिलीज केला जाणार आहे.
3/14
या सिनेमात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
4/14
पण, सिनेमाची पहिली झलक पाहिल्यापासूनच चाहते प्रत्येक पात्राबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. अशातच चर्चा रंगलीय ती, 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये मंथरेची भूमिका कोण सााकारतंय?
5/14
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये मंथरा ही महत्त्वाची भूमिका, अभिनेत्री शीबा चड्ढा साकारणार आहे. ही व्यक्तिरेखा कथेला मोठा कलाटणी देणारी ठरणार असल्याचं मानलं जातंय.
Continues below advertisement
6/14
दिल्लीमध्ये जन्मलेल्या शीबा चड्ढा या इंडस्ट्रीतील एक ओळखीचं आणि अनुभवी नाव. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली आणि त्याच माध्यमातून अभिनयाची भक्कम पायाभरणी केली.
7/14
कॉलेजच्या काळापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी नाट्यप्रयोगांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि हळूहळू व्यावसायिक अभिनयाकडे वाटचाल केली. सिनेसृष्टीत पदार्पणाबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी शाहरुख खान यांच्या 'दिल से' या सिनेमातून आपली कारकीर्द सुरू केली.
8/14
यानंतर 'दम लगा के हईशा', 'बधाई हो' आणि 'गली बॉय'सारख्या सिनेमामधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यांच्या भूमिका लहान असल्या तरी त्या प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडतात.
9/14
वेब सिरीजच्या विश्वातही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे; 'मिर्झापूर' आणि 'बंदिश बँडिट्स' मधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झालंय.
10/14
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या सिनेमांसाठी तिला विविध पुरस्कारांचं नामांकन मिळालंय, या सन्मानामुळे या क्षेत्रात तिची गुणवत्ता अधिकच अधोरेखित झालीय.
11/14
तिची खरी ताकद हीच आहे की, ती साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेत ती इमोशन्स आणि वास्तववाद यांचा सुरेख मेळ घालते. नेमक्या याच कारणामुळे तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात.
12/14
'दिल्ली 6', 'पर्झानिया' आणि 'तलाश' यांसारख्या सिनेमांमध्येही तिनं काम केलं असून, तिथेही तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक झालंय. विविध प्रकारच्या भूमिका साकारण्यातील अष्टपैलुत्वासाठी ही अभिनेत्री ओळखली जाते, मग ती एखादी भावूक भूमिका असो किंवा एखादं कणखर व्यक्तिमत्त्व, प्रत्येक वेळी ती आपल्या अभिनयातून काहीतरी नाविन्यपूर्ण सादर करते.
13/14
आता, 'रामायण' या आगामी कलाकृतीत 'मंथरा'ची भूमिका साकारून ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना चकित करण्यास सज्ज झाली आहे. यावेळी, ही भूमिका एका वेगळ्या दृष्टिकोनातून आणि अधिक सखोलतेनं सादर केली जाणार आहे.
14/14
थोडक्यात सांगायचं तर, या मनोरंजन क्षेत्रातील एका ओळखीच्या चेहऱ्याला आता 'रामायण' सारख्या एका भव्य प्रकल्पात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे, आणि या घडामोडीमुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Published at : 09 Apr 2026 02:07 PM (IST)