In Pics: बॉलिवूडमधील सर्वात कमी शिकलेल्या हिरोईन्स, कुणी बारावी नापास तर कुणी पाचवी पास!
बॉलिवूडमधील सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याबद्दल चाहत्यांना खास आकर्षण असतं. खासकरुन बॉलिवूडमधील नायिका ज्यावेळी फर्राटेदार इंग्रजी बोलतात. त्यावेळी त्यांचं शिक्षण काय झालं असावं असा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडतो. मात्र बॉलिवूडमधील अनेक हिरोईन्स अशा आहेत ज्यांचं शिक्षण फारच कमी झालं आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनम कपूर: अनिल कपूरची कन्या आणि अभिनेत्री सोनम कपूरनं ग्रॅज्यूएशन साठी प्रवेश तर घेतला मात्र शिक्षण पूर्ण केलं नाही. मुंबईच्या आर्य विद्या मंदिरमध्ये ती 12 वी पर्यंत शिकली.
कंगना रनौत: अभिनेत्री कंगना रनौत काही दिवसांपासून फार चर्चेत आहे. आपल्या बेधडक वक्तव्याने तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ही कंगना 12 वी नापास आहे. 12 वी नापास झाल्यानंतर कंगनानं घर सोडलं आणि अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमवायला बाहेर पडली.
करिश्मा कपूर: कपूर परिवारातील स्टार डॉटर अशी ओळख असलेली करिश्मा कपूरचं नावही या यादीत आहे. करिश्मा केवळ सहावीपर्यंत शिकली आहे.
दीपिका पादुकोण: या यादीत पहिलं नाव आहे सुपरस्टार दीपिका पादुकोणचं. अभिनय, नृत्य आणि सुंदरतेची खाण असलेली दीपिका ग्रॅज्यूएट देखील नाही. तिच्या आईचं स्वप्न होतं की तिनं किमान पदवीपर्यंत शिक्षण घ्यावं.
आलिया भट्ट: या यादीत पुढचं नाव आहे आलिया भट्टचं. आलिया खूप कमी वयात फिल्मी करिअर सुरु केलं. त्यानंतर तिला सतत सिनेमाच्या ऑफर्स मिळत राहिल्याने शिक्षण अपूर्ण राहिलं. आलिया 12 वी पर्यंत शिकलेली आहे.
राखी सावंत: राखी सावंत आपल्या बालपणी आठवणींबद्दल सतत काहीतरी माहिती देत असते. राखीनं कॉलेजपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तिनं मुंबईतून लोकसभा निवडणूक लढली होती. त्यावेळी शैक्षणिक पात्रता निरक्षर अशी सांगितली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -