Ajay Devgan: 3 वर्षे हीट सिनेमासाठी तरसला; अजय देवगणचे एकामागे एक सिनेमे फ्लॉप; 90 च्या एका फिल्मनं वाचवलं करियर
Ajay Devgan: केवळ एक अभिनेताच नव्हे, तर अजय देवगण एक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.
Continues below advertisement

Ajay Devgan
Continues below advertisement
1/9
Ajay Devgan: बॉलीवूडमध्ये अजय देवगणची स्वतःची वेगळी ओळख आहे. सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी अशा अनेक फिल्म्समध्ये त्याच्या भूमिकांचं कौतुक कायम झालं आहे.
2/9
पण तुम्हाला माहिती का असा एक काळ होता जेव्हा यशस्वी पदार्पण होऊनही अजय एका हिट सिनेमासाठी तरसला होता.
3/9
सलग 10 चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले आणि आपलं करियर अडचणीत आल्याचं त्याला वाटू लागलं. पण एका यशस्वी चित्रपटाने अजय देवगनचं करिअर वाचवलं.
4/9
अभिनेता अजय देवगणने 'फुल और कांटे ' या चित्रपटांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पहिलाच चित्रपट यशस्वी झाल्याने त्याला अनेक ऑफर्स आल्या.
5/9
सुरुवातीचे काही चित्रपट चांगले चालले. 1994 साली विजयपथ हा त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला.
Continues below advertisement
6/9
1994 ते 1997 दरम्यान अजयने अंदाजे दहा चित्रपट केले. जे सगळे एका मागोमाग एक जेमतेम आणि फ्लॉप ठरले.
7/9
सलग तीन वर्ष एका हिटच्या शोधात असलेल्या अजय देवगणचं करियर एका चित्रपटाने तारलं . हा चित्रपट होता 1997 मध्ये आलेला इश्क हा सिनेमा.
8/9
या चित्रपटात काजोल, जुही चावला आणि अमीर खान यांसारखे कलाकार होते.
9/9
इश्क ही रोमँटिक कॉमेडी बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरली. या चित्रपटाने 24.93 कोटी रुपयांची कमाई केली होती.
Published at : 03 Apr 2026 07:32 PM (IST)