Actress Priyanka Pandit: 'MMS'मुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं करिअर संपलं; आता प्रेमानंद महाराजांच्या हरि सेवकाशी लग्न, लवकरच होणार आई
Priyanka Pandit Is Pregnant: भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांकाच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत.
Continues below advertisement

Bhojpuri Actress Priyanka Pandit Is Pregnant
Continues below advertisement
1/8
एकेकाळी प्रियांका पंडित हिचं नाव भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असणारं नाव होतं. बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिची ओळख होती. तिने आपल्या कारकिर्दीत सुपरस्टार्स पवन सिंह आणि खेसारी लाल यादवसोबत काम केलंय.
2/8
पण एका एमएमएस वादामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. खरंतर, करिअरच्या उंचीवर प्रियांकाचा कथित एमएमएस व्हायरल झाला होता. ज्यामुळे तिचं आयुष्य वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
3/8
प्रियांकाचा बॉयफ्रेंडसोबतचा कथित एमएमएस व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओवरुन प्रचंड गोंधळ उडाला. दरम्यान, प्रियांकाने आपल्या व्हायरल एमएमएस व्हिडीओला फेक असल्याचं म्हटलं होतं.
4/8
मीडियासोबत चर्चा करताना प्रियांकाने व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं होतं. 'व्हिडीओत दिसणारी तरुणी, मी नाही, कुणी दुसरी आहे', असं तिने म्हटलं होतं.
5/8
अभिनेत्रीने असा आरोप केला की, तिचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी हा कट रचण्यात आला आहे. या वादानंतरही अभिनेत्री पूर्वीप्रमाणेच सोशल मीडियात सक्रीय होती. पण एमएमएसमुळे तिच्या करिअरवर परिणाम झाला, असं अभिनेत्री म्हणाली. तिचे काम अचानक बंद झाले.
Continues below advertisement
6/8
यानंतर मनोरंजन विश्वाला दूर करुन, अभिनेत्री भगवान कृष्णाच्या भक्तीत मग्न झाली. वृंदावनमध्ये स्थायिक झाली. अभिनेत्री आता स्वत:ला प्रेमानंद महाराज यांची शिष्या म्हणवते.
7/8
प्रियांकाने प्रेमानंद महाराज यांचे हरि सेवक यांच्याशी गुपचूप लग्न उरकलं. तिने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली.
8/8
आता ती गरोदर असून, लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियासमोर तिने आपल्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितले. तिचे फोटोस सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
Published at : 06 Oct 2026 11:15 AM (IST)