Asha Bhosle Top 10 Songs: अभी न जाओ छोडकर,के दिल अभी भरा नहीं...; आशा भोसलेंची 10 गाजलेली गाणी
Asha Bhosle: उद्या सायंकाळी 4 वाजता आशा भोसले यांच्यावर मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Asha Bhosle Top 10 SOngs
1/12
भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांनी आज जगाचा कायमचा निरोप घेतला.आपल्या स्वरांनी त्यांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
2/12
आजही त्यांच्या गाण्यांची जादू तितकीच ताजी आहे. ‘इन आंखों की मस्ती’पासून ते ‘दम मारो दम’पर्यंतची गाणी आजही प्रत्येकाच्या प्लेलिस्टमध्ये हमखास सापडतात. चला, त्यांच्या काही गाजलेल्या गाण्यांकडे एक नजर टाकूया.
3/12
अभी ना जाओ छोड कर: आशा भोसले यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये ‘अभी ना जाओ छोड़कर’ हे एक अजरामर गीत मानलं जातं. साधारणपणे 65 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'हम दोनो' या चित्रपटात हे गाणं समाविष्ट आहे.सुमारे चार मिनिटे आठ सेकंदांची ही सुरेल रचना मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात खुलली आहे.
4/12
‘इन आंखों की मस्ती’:1981 साली प्रदर्शित झालेल्या उमराव जान या चित्रपटातील हे अजरामर गीत आहे. रेखा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला आशा भोसले यांनी आपला स्वर दिला होता.
5/12
'पिया तू अब तो आजा': फिल्म 'कारवां' या चित्रपटातील हे सुपरहिट गाणं. आशाताईंनी आपल्या खास अंदाजात गाऊन या गाण्याला वेगळीच ओळख दिली आहे.
6/12
ओ मेरे सोना रे: हे तिसरी मंजिल 'मधील हे रोमँटिक गाणं मोहोम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं लोकप्रिय गाणं आहे.
7/12
आओ ना: 'मेरे जीवन साथी'या चित्रपटातील या गाण्यातराजेश खन्ना आणि हेलन दिसतात. आशाताईंच्या आवाजामुळे हे गाणं आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.
8/12
‘दम मारो दम’:1971 साली प्रदर्शित झालेल्या हरे राम हरे कृष्णा या चित्रपटातील हे गाणं झीनत अमान यांच्यावर चित्रित झालं होतं. त्या काळात या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
9/12
मेरा कुछ समान :'इज्जत' या चित्रपटातील हे अतिशय भावस्पर्शी गीत आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील या गाण्यात विरह, आठवणी आणि नात्यांची गुंतागुंत अगदी नाजूकपणे व्यक्त होते. आजही हे गाणं मनाला भिडतं.
10/12
‘कह दूं तुम्हें’: 'दिवार' मधील हे गाणं किशोर दा आणि आशा भोसले यांनी गायलं असून आजही चाहत्यांमध्ये याची क्रेझ कायम आहे.
11/12
ये रातें ये मौसम:'दिल्ली का ठग' या चित्रपटातील हे गोड रोमँटिक गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात रंगतं. रात्रीची मोहकता आणि प्रेमाची हलकीशी झुळूक या गाण्यातून अनुभवायला मिळते.
12/12
राधा कैसे नं जले: लगान या गाजलेल्या चित्रपटातील हे गाणं उदित नारायण आणि आशा भोसले यांनी गायलं आहे. राधा-कृष्णाच्या भावविश्वावर आधारित हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय असून त्यातील लय आणि भावनांचा सुंदर मिलाफ मन मोहून टाकतो.
Published at : 12 Apr 2026 02:44 PM (IST)