Anupamaa: 'अनुपमा'चा दी एन्ड? प्रेक्षकांची लाडकी अनुपमान करणार आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, मालिकेत नवा ट्वीस्ट
Anupamaa Twists: टेलिव्हिजन विश्वातली गाजलेली मालिका अनुपमाकडून प्रेक्षक सध्या पाठ फिरवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Anupama Serial Upcoming Twist
1/10
पण, आता ही बाब मेकर्सनी फारच सीरिअसली घेतली असून याबाबत नवनवे उपाय करायला सुरुवात केली आहे.
2/10
'अनुपमा' या टीव्ही मालिकेत दररोज काही ना काही ट्विस्ट येत असतात. शोचा टीआरपी वाढवण्यासाठी निर्माते अनेक युक्त्या वापरत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता निर्माते शोमध्ये एक नवीन ट्विस्ट आणणार आहेत.
3/10
स्टार प्लसवरील 'अनुपमा' हा शो सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. रुपाली गांगुली मुख्य भूमिकेत असलेला हा शो अनेकदा टीआरपीच्या रेसमध्ये यादीत अव्वल स्थानावर असतो.
4/10
'अनुपमा'चे निर्माते शोचा टीआरपी वाढवण्यासाठी दररोज नवनवे ट्विस्ट आणि सस्पेन्स निर्माण करतात. अशातच आता शोमध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याची बाब समोर येत आहे.
5/10
बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार, मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार, शोमध्ये अनुपमासोबत असं काहीतरी घडेल ज्यानंतर ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार आहे.
6/10
या शोमध्ये दाखवण्यात आलंय की, पराग ख्यातीला माफ करेल. त्यानंतर ख्याती घरी परत येईल.
7/10
पुढे, राही अनुपमाकडे जाईल आणि म्हणेल की, अनुपमानं तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वाचवलंय.
8/10
यादरम्यान, राही अनुजचं नाव घेऊन अनुपमाला खूप सुनावते. तिला खूप टोमणेही मारते.
9/10
अनुपमाची ही महानता राहीच्या नात्यासाठी घातक ठरेल असं राहीचं म्हणणं आहे. अनुपमान राहीला सॉरी म्हणते.
10/10
पण, राहीचा राग शांत होत नाही. ती अनुपमावर रागावते आणि तिथून निघून जाते.
Published at : 21 Apr 2025 08:39 AM (IST)