Amol Kolhe On TRP: सकाळी 6:00 वाजता मालिका hotstar वर दाखवता, TRP वरून अमोल कोल्हे यांचा वाहिन्यांना सवाल;म्हणाले..
काही दिवसांपूर्वी वाहिनीने दिलेलं टीआरपीचं कारण अर्धसत्य असल्याचेही ते म्हणाले होते.
Continues below advertisement

Amol Kolhe
Continues below advertisement
1/8
स्टार प्रवाह वाहिनीने TRP आणि मालिकेला लागणारा खर्च याची गणिते जुळत नसल्याचं कारण देत'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिका 152 एपिसोडमध्ये गुंडाळली.
2/8
अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी मालिका नव्याने youtube वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 20 जून रोजी म्हणजेच कालपासून ही मालिका 'मराठी वारसा ' या यूट्यूब चॅनलवर सुरू झाली आहे.
3/8
या मालिकेविषयी सांगताना डॉ अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी मालिकेच्या टीआरपीच्या गणितांविषयी कलाकाराला मिळणाऱ्या 'पर डे' विषयी अनेक धक्कादायक व महत्त्वाचे खुलासे केले.
4/8
ते म्हणाले,"'जेव्हा एखादी मालिका स्टार प्रवाहवर सुरू असते, तेव्हा ती हॉटस्टार वर सकाळी सहा वाजता पडलेली असते. DP, निर्माते, कलाकारांच्या डोक्यावर टांगती तलवार असते की संध्याकाळी प्रसारित होणाऱ्या तुमच्या मालिकेचा टीआरपी दाखवा"
5/8
अरे मग, सकाळी 6:00 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत जे लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर मालिका पाहिली,त्याचं तुम्ही काय करणार आहात?
Continues below advertisement
6/8
"त्यातून जो पैसा तयार होतोय. तिथे जे वैचारिक आणि ऐतिहासिक मूल्य तयार होतंय. त्याचा जर तुम्ही काहीच मोबदला देणार नसाल, तर ही पिळवणूक नाही का? असा सवाल डॉ अमोल कोल्हे यांनी केला.
7/8
डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणामुळे मालिकेच्या टीआरपीवर (TRP) कसा नकारात्मक परिणाम होतो यावरून त्यांनी वाहिन्यांना सवाल केलाय.
8/8
सगळ्या चॅनलचे आता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते मालिकेच्या बजेटच्या हिशोबाने होतं.' हेही त्यांनी नमूद केलं
Published at : 22 Jun 2026 03:15 PM (IST)