Aishwarya Rai Cannes 2026: ‘क्वीन इज बॅक!’ कान्समध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस अवतार पाहून साऱ्यांच्याच नजरा खिळल्या; PHOTOs पाहिलेत?
ड्रेसची रचना अशी होती की, ऐश्वर्या रेड कार्पेटवर चालताना प्रकाश आणि हालचालींनुसार त्याचा लूक सतत बदलत होता.

Aishwarya Rai
1/11
79 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या आगमनाने पुन्हा एकदा साऱ्यांच्या नजरा खिळल्या.
2/11
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्याने आपल्या देखण्या आणि हटके अंदाजाने रेड कार्पेट गाजवलं.
3/11
यावेळी ऐश्वर्याने प्रसिद्ध डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेला खास कुट्युर गाऊन परिधान केला होता.
4/11
‘लुमिनारा’ असं नाव असलेल्या या ड्रेसची संकल्पना ‘प्रकाशाची हालचाल’ अशी होती.
5/11
ड्रेसमध्ये अमित अग्रवाल यांच्या खास ‘क्रिस्टल व्हेन’ एम्ब्रॉयडरी तंत्राचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल 1500 तास मेहनत घेण्यात आली.
6/11
हजारो क्रिस्टल एम्बेलिशमेंट्सनी सजवलेला हा गाऊन ऐश्वर्या चालताना प्रकाशानुसार वेगवेगळ्या छटा दाखवत होता. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच भव्य आणि आकर्षक दिसत होता.
7/11
स्टायलिस्ट मोहित राय यांनी ऐश्वर्याचा हा खास लूक साकारला होता. ड्रेसची रचना अशी करण्यात आली होती की, प्रकाश पडताच त्यातील प्रत्येक भाग वेगळ्या पद्धतीने उजळून निघत होता.
8/11
खांद्यांवरील पंखांसारखी डिझाइन आणि स्ट्रक्चर्ड सिल्हुएटमुळे तिचा लूक आणखी उठून दिसत होता.
9/11
‘अॅबिस ब्लू’ रंगातील या ड्रेसमधून अवकाशातील अथांगता आणि प्रकाशाचा अनंत प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे ऐश्वर्याचा संपूर्ण अवतार एखाद्या रॉयल फॅशन स्टेटमेंटसारखा भासत होता.
10/11
या लूकबद्दल बोलताना डिझायनर अमित अग्रवाल म्हणाले, “ऐश्वर्या नेहमीच कान्समध्ये स्वतःची वेगळी छाप सोडते.
11/11
‘लुमिनारा’ हा फक्त ड्रेस नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं प्रतीक आहे.”
Published at : 23 May 2026 09:06 AM (IST)