Aishwarya Rai Cannes 2026: ऐश्वर्या रायचा कान्स 2026 मधील शेवटचा लूक पाहिलात? पांढऱ्याशुभ्र फेदर ड्रेसमध्ये केलं चाहत्यांना घायाळ
Aishwarya Rai Bachchan Cannes: कान्स क्विन ऐश्वर्या रायने तिच्या लूकने चाहत्यांची मनं जिंकली.

Aishwarya Rai
1/10
ऐश्वर्या राय बच्चन हिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये पुन्हा एकदा आपल्या स्टाइलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
2/10
ब्लू गाऊन आणि पिंक आउटफिटनंतर आता क्लोजिंग सेरेमनीतील तिचा ऑल व्हाईट पँटसूट लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
3/10
कान्स 2026 मधील ऐश्वर्याच्या प्रत्येक लूकची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. क्लोजिंग सेरेमनीमध्ये तिने ऑल व्हाईट पँटसूटसह फेदर डिटेलिंग असलेला ड्रामॅटिक केप परिधान केला होता.
4/10
तिचा हा रॉयल आणि पॉवरफुल अंदाज पाहून चाहत्यांसह विदेशी मीडियाही प्रभावित झालं.
5/10
रेड कार्पेटवर ऐश्वर्या दिसताच सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी पुन्हा एकदा तिला ‘क्वीन ऑफ कान्स’ म्हटलं आहे.
6/10
यावेळी ऐश्वर्याने आपला मेकअप अतिशय सॉफ्ट आणि एलिगंट ठेवला होता. सॉफ्ट रोज पेटल मेकअपसोबत तिने ओपन वेवी हेअरस्टाईल केली होती. विशेष म्हणजे, नेहमी स्ट्रेट ओपन हेअरमध्ये दिसणारी ऐश्वर्या यावेळी वेगळ्या अंदाजात पाहायला मिळाली.
7/10
तिने या आउटफिटसोबत मिनिमल ज्वेलरी परिधान केली होती, ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक आणखी क्लासी दिसत होता.
8/10
ऐश्वर्या राय बच्चन गेली अनेक वर्षे कान्स फिल्म फेस्टिव्हलचा भाग राहिली आहे. दरवर्षी तिच्या रेड कार्पेट लूकची चाहत्यांना उत्सुकता असते. यंदाही तिने आपल्या तिन्ही लूकमधून चाहत्यांना घायाळ केलं.
9/10
image 9विशेषतः क्लोजिंग सेरेमनीतील तिचा व्हाईट पँटसूट लूक सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहिला असून चाहत्यांनी पुन्हा एकदा तिला ‘कान्सची क्वीन’ म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
10/10
कान्स 2026 मधील हा ऐश्वर्याचा शेवटचा लूक होता.
Published at : 24 May 2026 03:39 PM (IST)