सैय्यारा सिनेमातील अहान पांडेच्या शर्टची तुफान चर्चा, किंमत ऐकून डोळे विस्फारतील
Ahaan Panday shirt price : सैय्यारा हा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. सिनेमातील कलाकारांच्या लूकची देखील तेवढीच चर्चा रंगतीये.

Ahaan Panday shirt price
1/10
सिनेसृष्टीत बॉक्स ऑफिसवरील कमाईच चित्रपटाची ओळख ठरवत असते. दिग्दर्शित मोहित सुरी यांनी टार्गेट ऑडिअन्स ठेऊन दिग्दर्शित केलेला सैय्यारा सिनेमाने आता मोठी कमाई केली आहे.
2/10
अवघ्या 10 दिवसांत सैय्यारा या सिनेमाने भारतात 248.43 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
3/10
सैय्यारा सिनेमामुळे शाहरुख खानचा डंकी (227 कोटी) आणि अजय देवगणचा सिंघम अगेन (247.86 कोटी) हे मोठ्या स्टार पॉवर असलेले चित्रपट मागे पडले आहेत.
4/10
सैयारामध्ये नवोदित कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यापेक्षा कितीतरी अधिक यशस्वी ठरलाय.
5/10
सैय्यारा सिनेमात क्रिश कपूरची भावनिक स्टोरी दाखवण्यात आली आहे. तो एक तरुणी संगीतकार आहे. ही भूमिका अहान पांडे याने साकारली आहे. तर सिनेमातील वाणी कपूरची भूमिका अनित पड्डा हिने साकारली आहे. सिनेमात ती वैचारिक लेखक आहे. सैय्यारामध्ये एक खास लव्हस्टोरी आहे. जी प्रेक्षकांना भावूक करत आहे.
6/10
दरम्यान, या सिनेमाबरोबरच अहान पांडे आणि आणि अनित पड्डा यांच्या स्टाईलची देखील सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
7/10
अहान पांडेचा ब्लॅक शर्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा त्याचा लूक सर्वांना पसंत पडतोय.
8/10
एका गाण्यात अहान पांडेने ब्लॅक टी शर्टमध्ये सिगारेट ओढतान स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळतोय. मीडिया रिपोर्टनुसार, या शर्टची किंमत 4.5 हजार ते 6 हजारांच्या दरम्यान आहे.
9/10
'सैयारा' हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. त्याचे बजेट 50-60 कोटी असल्याचे सांगितले जाते.
10/10
हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. अहान पांडे आणि अनित पद्डा यांनी या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. हा एक रोमँटिक संगीतमय प्रेमकथेचा चित्रपट आहे.
Published at : 28 Jul 2025 03:37 PM (IST)