एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
बॉलिवूड अन् टॉलिवूड गाजवणारी धुळ्याची मराठमोळी अभिनेत्री, इन्स्टाग्रामवर 14 मिलियन फॉलोअर्स
Actress Mrunal Thakur : बॉलिवूड अन् टॉलिवूड गाजवणारी धुळ्याची मराठमोळी अभिनेत्री, इन्स्टाग्रामवर 14 मिलियन फॉलोअर्स
Actress Mrunal Thakur
1/10

अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या इंग्लंडमधील ग्लास्गो शहरात आहे. ग्लाग्सोमधील एका गार्डनमध्ये मृणालने nature walk केले असून तिने यावेळीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मृणालच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
2/10

मृणाल ठाकूर (Actress Mrunal Thakur) ही एक प्रतिभावान भारतीय अभिनेत्री आहे, जिने मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3/10

1 ऑगस्ट 1992 रोजी धुळे, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या मृणालने आपले शालेय शिक्षण जळगावच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पूर्ण केले आणि नंतर मुंबईतील वसंत विहार हाय स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तिने किशिंचन चेलाराम कॉलेज, मुंबई येथून मास मीडिया मध्ये पदवी प्राप्त केली.
4/10

मृणालने (Actress Mrunal Thakur) आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2012 मध्ये स्टार प्लसवरील 'मुझसे कुछ कहती...ये खामोशियाँ' या मालिकेत गौरी भोसले गायकवाडच्या भूमिकेतून केली.
5/10

त्यानंतर 'कुमकुम भाग्य' या लोकप्रिय मालिकेत बुलबुल अरोरा ही भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. तिने 'नच बलिये 7' आणि 'बॉक्स क्रिकेट लीग' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला.
6/10

मृणाल ठाकूरचे (Actress Mrunal Thakur)चित्रपटसृष्टीतील पदार्पण 2014 मध्ये 'विट्टी डांडू' आणि 'सुराज्य' या मराठी चित्रपटांमधून झाले.
7/10

2018 मध्ये 'लव्ह सोनिया' या आंतरराष्ट्रीय चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली, ज्यात मानव तस्करीच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला होता.
8/10

2019 मध्ये 'सुपर 30' आणि 'बाटला हाऊस' या हिंदी चित्रपटांमधून तिने मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 2022 मध्ये 'सीता रामम' या तेलुगू चित्रपटात तिच्या भूमिकेसाठी तिला 'फिल्मफेअर बेस्ट अॅक्ट्रेस – तेलुगू' पुरस्कार मिळाला.
9/10

या भूमिकेसाठी तिला लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट न्यूकमर' पुरस्कार मिळाला.
10/10

मृणाल ठाकूरने (Actress Mrunal Thakur) आपल्या अभिनय कौशल्याने विविध भाषांतील चित्रपटसृष्टीत आपले स्थान मजबूत केले आहे. तिच्या विविध भूमिका आणि अभिनयातील सखोलता ह्यामुळे ती आजच्या काळातील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Published at : 18 May 2025 06:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग



















