मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक अडकला लग्नबंधनात; पाहा लग्न सोहळ्याचे खास फोटो
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार मिलिंद आणि राणी गुणाजी यांचा मुलगा, अभिषेक गुणाजी हा नुकताच राधा पाटील हिच्या सोबत लग्न बंधनात अडकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराधा आणि अभिषेकची चर्चा त्यांच्या साखरपुड्याच्या बातमी नंतर भरपूर रंगली होती.
सोशल मीडियावर त्यांच्या जोडीचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.
या जोडप्याने त्यांचे लग्न मालवण येथे नयनरम्य वातावरणात करण्याचे ठरवले होते, या ‘अनोख्या डेस्टिनेशन वेडिंग’ संकल्पनेचे राणी आणि मिलिंद यांनी भरपूर कौतुक केले.
लग्न सोहळ्याबद्दल बोलताना मिलिंद गुणाजी म्हणाले, आम्ही एक कुटुंब म्हणून आपली संस्कृती आणि वारसा जपला आहे. म्हणून आम्ही वालावल, मालवण येथे खाजगी समारंभ करण्याचे निवडले आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा, अतुलनीय पर्यटनस्थळांचा आणि अजोड गडकिल्ल्यांच्या खजिन्याचा मी नेहमीच प्रचार करत आलोय. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा व्हावा अशी आमची इच्छा होती. हा महत्वाचा संदेश आपल्या स्वतःच्या जीवनशैलीतून देण्याचा हा आमचा एक प्रयत्न होता. महाराष्ट्रात असलेली पर्यटन स्थळे परदेशातल्या पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत.त्यामुळे अशाच सुंदर डेस्टिनेशन वर हा लग्नसोहळा करण्याचे ठरले.
अभिषेक हा आय.टी. अभियंता आहे, अभिषेकने अलीकडेच सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत 'छल' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या लघुपटाला बर्लिन फ्लॅश फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे.
या व्यतिरिक्त अभिषेक व्यावसायिक जाहिरातींसाठी देखील काम करत आहे.
अभिषेकची पत्नी राधा, ही देखील मुंबईत फार्मा क्षेत्रात काम करत आहे.