हळद लागली अंगाला... सोहम बांदेकर अन् पूजा बिरारीच्या हळदीचे खास क्षण, 'वर'मायचा आनंदी आनंद
मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराईची लगबग सुरुच आहे. एकामागून एक कलावंतांच्या घरी सनई चौघडे घुमत आहेत.

Soham Bandekar Wedding
1/10
मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे अभिनेते, कलाकार आदेश बांदेकर यांच्या घरात लेकाच्या लग्नापूर्वीचे विधी सुरु आहेत.
2/10
कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण असून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच बोहोल्यावर चढणार आहे
3/10
सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा हळद समारंभ नुकताच पार पडला. या सोहळ्यातील Exclusive क्षण abp माझावर आले आहेत.
4/10
हळदीच्या समारंभात सोहम आणि पूजा दोघेही धमाल करताना दिसले. दोघांनीही ठेका धरत आपलं आनंद व्यक्त केला.
5/10
पूजा बिरारी मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक. ‘स्वाभिमान’, ‘साजणा’पासून ते सध्या स्टार प्रवाहवरील गाजणारी मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ या सर्वांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकल आहे.
6/10
तिच्या हळदीतील निखळ उत्साह, सोनेरी लूक आणि कुटुंबीयांची धमाल यामुळे कार्यक्रम अधिकच खुलला.
7/10
दुसरीकडे, सोहम बांदेकरही मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण करत आहे. निर्माता म्हणून तो ‘बांदेकर प्रोडक्शन्स’ चालवतो आणि ‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मालिका त्याच्याच बॅनरखाली साकारली गेली आहे.
8/10
आपल्या भावी आयुष्यातील नव्या अध्यायाच्या सुरुवातीच्या क्षणी कुटुंबीय आणि मित्रांची उपस्थिती सोहळ्यात रंग भरत होती.
9/10
सुचित्रा बांदेकर आपल्या भावी सुनेला हळद लावताना दिसल्या.
10/10
सोहम आणि पूजाच्या हळदीतील रंग, हशा आणि निखळ आनंदाचे क्षण पाहून मराठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.आता दोघांच्या लग्नसोहळ्याची सर्वांनाच आतुरता लागलीय.
Published at : 01 Dec 2025 07:15 PM (IST)