शपथविधी सोहळ्यात जेव्हा त्रिशा थलापती सीएम विजय यांच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेते! नात्याची पुन्हा एकदा रंगली चर्चा
Trisha Krishnan: थलपथी विजय यांची जवळची मैत्रीण त्रिशा कृष्णन आई उमा कृष्णन यांच्यासोबत शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती. त्रिशाच्या लूकचीही खूप चर्चा झाली.
Continues below advertisement

Trisha Krishnan
Continues below advertisement
1/10
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सी. जोसेफ विजय यांनी भव्य सोहळ्यात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात केली. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
2/10
या विशेष प्रसंगी विजयचे चाहते आणि कुटुंबीय भावूक झाले होते, तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
3/10
निळ्या रंगाच्या साडीत अत्यंत सुंदर दिसत असलेल्या त्रिशाने केवळ सोहळ्यात भागच घेतला नाही, तर विजयच्या कुटुंबासोबतच्या तिच्या जवळीकीच्या चर्चांनाही पुन्हा एकदा हवा दिली.
4/10
या सोहळ्यादरम्यानचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हा त्रिशा, आई उमा कृष्णनसोबत पहिल्या रांगेत बसली, तेव्हा तिने विजय यांच्या आई, शोभा चंद्रशेखर यांचे प्रेमाने स्वागत केले.
5/10
त्रिशाने वाकून नमस्कार केला आणि दोघींनी एकमेकींना मिठी मारून काही वेळ गप्पा मारल्या.
Continues below advertisement
6/10
मातृदिनी झालेल्या या सोहळ्यात, विजय आपल्या नवीन जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे सांभाळेल, असा विश्वास अभिमानाने व्यक्त करण्यात आला.
7/10
त्रिशा आणि विजय हे कॉलीवूडमधील (तमिळ चित्रपटसृष्टीतील) सर्वात आवडत्या जोडींपैकी एक आहे. 'घिल्ली' पासून 'लिओ' पर्यंत, या दोघांनी अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत.
8/10
मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक नात्याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. विजय यांचा पत्नी संगीतासोबत घटस्फोट आणि त्रिशासोबत वाढत चाललेली जवळीक चर्चेत आहे.
9/10
चेन्नईमधील एका लग्नसमारंभात सारखे कपडे घातलेले दिसल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशाच्या विशेष उपस्थितीने या चर्चांना आणखी खतपाणी घातले आहे.
10/10
तथापि, या दोघांनी नात्याला सार्वजनिकरित्या दुजोरा दिलेला नाही.
Published at : 10 May 2026 05:57 PM (IST)