शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीने 25 पेक्षा जास्त महापालिकेवर वर्चस्व मिळवलं असून मुंबईतही महायुतीने सत्ता काबिज केली आहे. त्यामुळे, ठाकरेंना हा धक्का मानला जातो.

Yashwand killedar Raj Thackeray mumbai
1/7
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीने 25 पेक्षा जास्त महापालिकेवर वर्चस्व मिळवलं असून मुंबईतही महायुतीने सत्ता काबिज केली आहे. त्यामुळे, ठाकरेंना हा धक्का मानला जातो.
2/7
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची बनली होती, त्यामध्ये मनसेकडून यशवंत किल्लेदार यांच्या नावाने मनसेनं पहिला उमेदवार मैदानात उतरवला होता. अखेर, निवडणूक निकालात ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नसलं तरीही यशवंत किल्लेदार विजयी झाले आहेत.
3/7
आपल्या विजयानंतर यशवंत किल्लेदार यांनी शिवतीर्थ निवास्थान आणि शिवाजी पार्क परिसरात जाऊन विजयोत्सव साजरा केला. यावेळी, राज ठाकरेंनी फ्लाईंग किस देत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
4/7
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे वार्ड 192 मधील ठाकरे बंधूंच्या युतीचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी निवडणुकीत मनसेचा दादरचा गड सांभाळला आहे. त्यामुळे, ठाकरेंचा मान ताठ राहिली.
5/7
किल्लेदार यांच्या विजयोत्सवचा जल्लोष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून शिवतीर्थ बंगल्याबाहेर जल्लोष केला.
6/7
राज ठाकरे सहकुटुंब आणि मनसे नेत्यांसह कार्यकर्त्यांसाठी गॅलरीमध्ये आले होते, मनसेचे बाळा नांदगावकर आणि इतर नेते राज ठाकरेंसह होते.
7/7
दरम्यान, यशवंत किल्लेदार यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही फोनवरुन कौतुक केले, तसेच शिवसेना भवन आता तुझ्या प्रभागात आहे ते तुला सांभाळायचं आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
Published at : 16 Jan 2026 09:42 PM (IST)