Chhatrapati SambhajiNagar: ज्या भागात इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवत राडा घातला, त्याच बाईजीपुऱ्यात ओवेसींची रॅली, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Chhatrapati SambhajiNagar: एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आज छत्रपती संभाजीनगर बाईजीपुरा भागात प्रचार रॅली होतेय. या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Continues below advertisement
Chhatrapati Sambhajinagar News
Continues below advertisement
1/5
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठीचा (Mahapalika) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून राजकीय वातावरण देखील तापलं आहे. यंदा मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर महापालिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण, दोन शिवसेना, भाजप आणि एमआयएम पक्ष येथे ताकदीने निवडणूक लढवत आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीही मैदानात आहे.
2/5
दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील प्रत्यक्षात मैदानात उतरत सभांचा धडाका लावला आहे. विशेषतः मराठवाड्यात एमआयएम (MIM) पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येतंय. छत्रपती संभाजीनगरच्या बाईजीपुरा भागातून आज असदुद्दीन ओवेसींची रॅली जात आहे.
3/5
दरम्यान, हा तोच परिसर आहे ज्या भागात माजी खासदार आणि पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz jalil) यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. धावत्या कारच्या मागे पळून जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आज त्याच भागात असदुद्दीन ओवेसी प्रचार रॅली काढत आहे.
4/5
छत्रपती संभाजीनगरच्या बाईजीपुरा भागातून ओवेसीची रॅली जातेय. दरम्यान, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आलं असून जणू छावणीचे रूप या ठिकाणी बघायला मिळतंय. याच भागात इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले होते आणि राडाही झाला होता.
5/5
संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी खबरदारी घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या रॅलीला मोठ्यासंख्येनं कार्यकर्ते उपस्थित झाले आहे. त्यामुळे एकप्रकारे मोठं शक्तीप्रदर्शन या भागात एमआयएमकडून करण्यात येतंय.
Continues below advertisement
Published at : 12 Jan 2026 03:08 PM (IST)
= 5">