एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; साडेचारशे वर्षांची परंपरा

एरवी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत,भानुदास एकनाथ गजरामध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मात्र यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय पालखी विश्वस्तांनी घेतला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी पैठणमध्ये एकत्र येतात.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभर एकमेकांपासून दूर राहिलेले वारकरी, महिनाभर वारीच्या निमित्ताने एकत्र राहतात.
पालखी हे त्यांच्यासाठी घर होऊन जातं. मात्र यावेळी या आनंदापासून दूर राहावे लागणार असल्याने प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह काही दिसला नाही.
अगदी सकाळपासून गोदावरीच्या काठावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळायची. मात्र आज गोदावरीचा काठ भक्ताविना ओस होता.
दशमीपर्यंत ही पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असणार आहे.
औरंगाबाद आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या सात मानाच्या पालखी सोहळ्यापैकी एक संत एकनाथ पालखी सोहळा.
साडेचारशे वर्षापेक्षा अधिकची या पालखी सोहळ्याला परंपरा आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच मोजक्या वारकऱ्यांसह पालखीने प्रस्थान केले आहे.
डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, तोंडाला मास्क आणि 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीत नाथाच्या पालखीने दुपारी 1 वाजेच्या दरम्यान नाथच्या जुन्यावाड्यातून प्रस्थान ठेवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -