Diwali Rangoli Design 2020 : दिवाळीनिमित्त रांगोळी काढण्यासाठी 'या' आकर्षक डिझाइन्स
रांगोळी काढण्यासाठी केवळ रांगोळी आणि रंगांचाच नाहीतर तुम्ही फुला-पानांचाही वापर करू शकता. फुलं पानं वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये मांडून तुम्ही सुंदर रांगोळी तयार करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरेख रांगोळीभोवती पण्यत्यांची आरास केल्यावर रांगोळीची शोभा आणखी वाढते.
रांगोळीमध्येही अनेक प्रकार आहेत. त्या प्रकारांनुसार ती काढण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती रांगोळी यांसारख्या रांगोळ्यांसोबतच तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन्सच्याही रांगोळ्या काढू शकता.
रांगोळी काढणं तसं पाहायला गेलं तर फारसं सोपंही नाही. पण या डिझाइन्सच्या मदतीने तुम्हीही तुमच्या अंगणात सुंदर रांगोळी काढू शकता.
दिवाळीत आकाश कंदील, फराळ, पणत्यांची आरास आणि रोषणाईसोबत रांगोळीही तितकीच महत्त्वाची असते.
दारात किंवा अंगणात काढलेली सुंदर आणि सुरेख रांगोळी लोकांचं लक्षं आकर्षित करते. काही खास रांगोळीच्या डिझाइन्स...
दिवाळी निमित्त अंगणात किंवा दारासमोर रांगोळी काढली जाते. अशातच तुम्हीही जर ट्रेंडि रांगोळीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळीच्या डिझाइन्स घेऊन आलो आहोत.
देशभरात कोरोनाच्या प्रार्दुर्भावात दिवाळी साजरी केली जात आहे. अशातच दिवाळी साधेपणाने साजरी केली जात असली तरी उत्साह मात्र तोच आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -