भंडाऱ्यात जलाशय ओव्हरफ्लो होताच नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाच्या परिस्थितीतही जिल्हा प्रशासन व नागरिक गंभीर नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरूच असून आज भंडारा जिल्ह्यात 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
आज रविवार असल्याने लोकांनी विकेंड साजरा करण्यासाठी शिवणीबांध तलावावर मोठी गर्दी केली होती.
यावेळी नागरिकांनी कोरोना संबधीची कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचं दिसून आलं. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला.
कोरोनाचं भान न ठेवता पाण्याचा आनंद लोकांनी लुटला. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी सिवनीबांध जलाशयाच्या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली.
भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या पाऊसामुळे नदी नाल्याना पूर आला असून जिल्हा प्रशासन तसेच पोलीश यंत्रणा पुरात अडकलेल्या लोकांना काढण्यात व्यस्त आहे. असं असलं तरी जिल्ह्यातील काही लोकांनी ओव्हरफ्लो तलावांवर जाऊन गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -