एक्स्प्लोर
Vaishnavi Hagawane Death: दरवाजा ठोठावला, बेल वाजवली; वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी काका कस्पटे घरी जाताच काय काय घडलं?
Vaishnavi Hagawane Death: राष्ट्रवादीचा बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेच्या सुनेने आत्महत्या केल्यावर आता 9 महिन्यांच्या बाळावरून वाद पेटलाय.
Vaishnavi Hagawane Death
1/6

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
2/6

राष्ट्रवादीचा बडतर्फ तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेच्या सुनेने आत्महत्या केल्यावर आता 9 महिन्यांच्या बाळावरून वाद पेटलाय. वैष्णवीचं बाळ तिचा नवरा शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे दिल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केलाय. मात्र बाळ ताब्यात देण्यास नकार दिला जातोय. वैष्णवीचे काका आजही बाळ ताब्यात घेण्यासाठी चव्हाण कुटुंबाकडे गेले, मात्र त्यांना दारच उघडलं गेलं नाही. बाळ आत आहे की नाही याचीही आता त्यांना खात्री राहिलेली नाही.
3/6

वैष्णवीच्या काकांनी चव्हाणांच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावला, बेल वाजवली, मात्र कोणाही दरवाजा उघडला नाही. दरवाज्याला बाहेरुन कुलुपही नव्हते, परंतु दरवाज्याला आतमधून कडी लावण्यात आली होती.
4/6

वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबीयांकडे असणारं बाळ पुण्यातील बंदूकधारी निलेश चव्हाणकडे होते. मात्र आता तिथून बाळ गायब झालं, मग नेमकं कुठं गेलं. असा प्रश्न वैष्णवीच्या वडिलांनी उपस्थित केला.
5/6

आता बाळ हगवणेंच्या नातेवाईकांकडे दिलंय असं बोललं जात असलं तरी बाळ चव्हाणकडे आहे, असा आमचा संशय आहे. बाळ आमच्याकडे देण्यासाठी प्रशासन काहीचं प्रयत्न करेना, अशी खंत ही वैष्णवीच्या वडिलांनी व्यक्त केली.
6/6

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणेंची राष्ट्रवादीने हकालपट्टी केलीये, पण एवढं करुन चालणार नाही. तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केलीये. राज्य महिला आयोग पदी ही अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर आहेत, त्यांनी जे वक्तव्य दिलं ते योग्य आहे. पण त्यांनी अद्याप आम्हाला एकदा ही संपर्क साधला नाही. किंबहुना अजित पवार गटाकडून कोणीही आमचं सांत्वन करायला आलं नाही, अशी खंत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्ती केली.
Published at : 22 May 2025 11:14 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
राजकारण


















