एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Vaishnavi Hagawane Death: माझ्यावरही अत्याचार, मलाही मारहाण..., पण 'त्या' एका कारणामुळे मी वाचली; हगवणेंच्या मोठ्या सूनेनं सगळं सांगून टाकलं!
Vaishnavi Hagawane Death: वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबियांचे नवनवीन कारनामे समोर येत आहे. हगवणेंची मोठ्या सूनेला देखील मारहाण करण्यात येत होती.
Vaishnavi Hagawane Death
1/8

Vaishnavi Hagawane Death: सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
2/8

वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबियांचे नवनवीन कारनामे समोर येत आहे. हगवणेंची मोठ्या सूनेला देखील मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे ती घर सोडून माहेरी राहत होती. याबाबत आता स्वत: मयुरीने आज एबीपी माझाशी बोलताना हगवणे कुटुंबियांवर धक्कादायक आरोप केले आहेत.
3/8

पती घरी नसताना दीर, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदमपणे मारहाण केली जात होती, असा आरोप हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप यांनी केला आहे.
4/8

आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे, त्यांनीच माहेरी आणून सोडल्याने मी जिवंत राहिली. त्यांच्या कुटुंबातील (हगवणे) कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव त्यांना (पती) सुद्धा होती, अशा शब्दांमध्ये हागवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप यांनी सनसनाटी खुलासा आणि गंभीर आरोप केले आहेत.
5/8

सासरा, सासू नणंद आणि दीरांकडून भयंकर पद्धतीने माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास दिला जात होता, असे हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप यांनी सांगितले.
6/8

हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप यांनी सनसनाटी खुलासा आणि गंभीर आरोप केले. सासरा, सासू नणंद आणि दीरांकडून भयंकर पद्धतीने माझ्यासह वैष्णवीला सुद्धा त्रास दिला जात होता असा आरोप मयुरी जगताप यांनी केला आहे.
7/8

शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या, मयुरी जगतापचा आरोप तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचं आपण स्वत: ऐकल्याचा दावा देखील मयुरी जगताप यांनी केला आहे.
8/8

मृत वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे याने मयुरी जगतपाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. या मारहाण केली म्हणून पौड पोलिसात गुन्हा दाखल आहे.
Published at : 22 May 2025 02:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र



















