Trupti Desai On Neelam Gorhe In Ashok Kharat Case: नीलम गोऱ्हे, एक्सप्रेस-इन हॉटेल, अशोक खरात आणि आमदारकी; तृप्ती देसाईंच्या 5 खळबळजनक आरोपाने राजकारण हादरलं!
Trupti Desai On Neelam Gorhe In Ashok Kharat Case: तृप्ती देसाईंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर धक्कादायक आरोप केले.
Continues below advertisement

Trupti Desai On Neelam Gorhe In Ashok Kharat Case
Continues below advertisement
1/8
Trupti Desai On Neelam Gorhe In Ashok Kharat Case: शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) गेले पाच ते सहा वर्षे अशोक खरात (Ashok Kharat) याच्याकडे जात होत्या. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोऱ्हे अनेक गोष्टींवर बोलतात. आता अशोक खरातवर का बोलत नाहीत? याचं कारण नीलम गोऱ्हे यांचे अशोक खरातसोबत चांगले संबंध होते, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला. तृप्ती देसाईंनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. (Trupti Desai On Neelam Gorhe)
2/8
अशोक खरात पाथर्डी येथील पैसा हॉटेलमध्ये भेटायला देखील आला होता. तो तिथं तुम्हाला भेटण्यास का आला होता. तुमच्यात आणि त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार आहेत का? का आणखीन काही हे सगळ्या गोष्टी समोर यायला हवेत, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
3/8
नाशिकमधील एक्सप्रेस-इन हॉटेलमध्येही नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात यांची भेट झाली. आमदारकी आणि मंत्रिपदसाठी अनेकवेळा भेटल्या होत्या, असा धक्कादायक आरोपही तृप्ती देसाईंनी केला.
4/8
नीलम गोऱ्हे गेले सात ते आठ वर्षांपासून अशोक खरातला ओळखत होत्या. नीलम गोऱ्हे यांचा अशोक खरात यांच्याशी काही आर्थिक देवाणघेवाण आहे का? याच्याबाबत एसआयटीने चौकशी करायला हवी, असं तृप्ती देसाईंनी सांगितले.
5/8
नीलम गोऱ्हे यांच्यासोबत अशोक खरात यांना भेटायला जे जात होते, ते मला येऊन भेटले आहेत. त्यांनी मला या संदर्भात सगळी माहिती दिली आहे. आणि वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणेल, असा दावाही तृप्ती देसाईंनी केला.
Continues below advertisement
6/8
नीलम गोऱ्हे यांनी या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं. रूपाली चाकणकरांवर ज्या पद्धतीने कारवाई झाली त्याच पद्धतीने नीलम गोऱ्हे यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी, अशी मागणी तृप्ती देसाईंनी यावेळी केली.
7/8
स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
8/8
अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आता त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवला आहे. खरातच्या 'शिवनिका' संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहे. त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. त्यामुळे रुपाली चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही सासेमिरा लागण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजीमाजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 30 Mar 2026 11:09 AM (IST)