ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे इंधन पुरवठा कमी झाल्याने नागरिकांच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून अवैध सिलेंडर, आणि इंधन पुरवठ्यावर कारवाई केली जात आहे.

Thane Excise department seized truck
1/7
राज्यात एकीकडे इंधन पुरवठा कमी झाल्याने नागरिकांच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून अवैध सिलेंडर, आणि इंधन पुरवठ्यावर कारवाई केली जात आहे.
2/7
त्यातच, आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट मद्यसाठा जप्त केला असून एका कंटेनरमधून ह्या दारुची विक्री होत होती.
3/7
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे, एक्साईज विभागाने ही कारवाई केली असून कंटेनरमधून तब्बल 1.65 कोटींचा साठा जप्त करण्यात आलाय.
4/7
बनावट औषध वाहतुकीचे चलन बनवून गोवा बनावटीचा मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या कंटेनरला राज्य उत्पादन शुल्कने सापळा रचून पकडले.
5/7
कंटेनरमधून हा मद्यसाठा नेमका कुठे घेऊन जात होते यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभाग पुढील चौकशी करत असल्याचे राजे उत्पादन शुल्क ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितले.
6/7
मागील दीड वर्षात राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने तब्बल 15 कोटीहून अधिकचा मद्यसाठा जप्त केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
7/7
दरम्यान, आज उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना अटकही करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Published at : 05 May 2026 09:17 PM (IST)